मनीषा निमोणकरला कास्य तर कोमल शिंदेला रौप्य पदक
नगर-जम्मू-काश्मीर मध्ये श्रीनगर येथे झालेल्या अखिल भारतीय १० व्या पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये अहिल्यानगर पोलीस दलातील मनीषा निमोणकरने कांस्यपदक तर कोमल शिंदेने रौप्य पदक मिळवले आहे,काश्मीर वरून परतल्यानंतर काल त्यांचा मुंबईमध्ये एडीजे पोलीस मुख्यालयात त्यांचा एडीजे कृष्णप्रकाश यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला,यावेळी एडीजे मधुकर पांडे,आईजी श्री त्रिमुखे,एएसओ श्री कांबळे आदी सह महाराष्ट्रातून 11 पदक प्राप्त खेळाडू उपस्थित उपस्थित होते
पींच्याक सिलंट(बॉक्सिंग,कुस्ती,कराटे)या क्रीडा प्रकारात 80 किलो वजन गटात पोलीस मुख्यालयातील मनीषा निमोनकरने दिल्लीच्या पोलीस खेळाडूचा पराभव करून तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक मिळवले तर तोफखाना पोलीस स्टेशनची कोमल शिंदे हिने 85 किलो वजन गटात पंजाबच्या एसएसबी च्या खेळाडूचा पराभव करत द्वितीय क्रमांक मिळवत रोप्य पदक पटकावले
अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात त्या दोघी 15 वर्षापासून प्रॅक्टिस करत असून त्यांना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,आरपीआय परदेशी,स्पोर्ट इन्चार्ज व्हिक्टर जोसेफ यांचे मार्गदर्शन लाभले, नगर जिल्ह्यातून फक्त या दोघींनाच पदके मिळाली आहे. महाराष्ट्रातून एकूण 85 खेळाडू गेले होते,त्यामध्ये ११ जणांना पदके मिळाली आहेत,आंतर जिल्हा सामने नगर शहरात झाल्यानंतर नाशिक येथे विभागीय सामने झाले व ठाणे येथे स्टेट चे सामने झाले.या ठिकाणी प्रतिस्पर्ध्याला हरवून या दोघींनी महाराष्ट्राच्या संघात स्थान पटकावले होते
काश्मीर मध्ये झालेल्या या ऑल इंडिया पोलीस क्रीडा स्पर्धेत पदक मिळाल्याबद्दल दोघींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 
 
 
 
 
 
 
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com