शिर्डी मधील सहा हाॅटेल्सवर श्रीरामपूर पाेलिसांचा छापा, १५ मुलींची सुटका, ११ जण ताब्यात
शिर्डी। अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील ६ हॉटेलवर छापा टाकून अनैतिक अवैध व्यवसाय करणाऱ्या प्रतिष्ठित लोकांच्या मालकीच्या हॉटेलवर श्रीरामपूर पाेलिसांनी छापा टाकत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.या घटनेमुळे शिडीत मोठी खळबळ उडाली आहे.
श्रीरामपूरचे विभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त खबऱ्यामार्फत शिर्डीत काही हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अनैतिक अवैध व्यवसाय चालतो अशी माहिती मिळाली. संदीप मिटके यांच्या पथकाने शिर्डीतील एकाचवेळी ६ हॉटेलवर छापे टाकले. या छाप्यात ११ पुरुषांना ताब्यात घेऊन १५ पीडित मुलींची सुटका केली आहे.
श्रीरामपूर पोलिसांच्या कारवाईने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शिर्डी शहरात शुक्रवारी जवळपास सहा हॉटेलवर छापा टाकण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी अनैतिक अवैध व्यवसाय करणारे हॉटेल चालक व यात सामील असणाऱ्या इतर लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शिर्डीत एकाच वेळी आशा प्रकारच्या अवैध अनैतिक व्यवसाय करणाऱ्या हॉटेलवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 
 
 
 
 
 
 
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com