Top News

Drawing Competition: राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अपुर्वा नांदुरकर द्वितीय

Drawing Competition:  रोख 30 हजार रुपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक प्रदान


Drawing Competition:  रोख 30 हजार रुपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक प्रदान


     

 Drawing Competition:  अहमदनगर (प्रतिनिधी)  - मुंबई येथील उर्जा सरंक्षणपर राष्ट्रीय अभियान 2023 अंतर्गत विद्युत मंत्रालय भारत सरकार आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत नगरच्या अपुर्वा सागर नांदुरकर हिच्या ‘एक धरती अनेक प्रयास’ या चित्रास द्वितीय क्रमांक मिळाला. स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख 30 हजार रुपयांचे बक्षीस जे.जे. स्कूल आर्टचे प्रशिक्षक श्री.वाघघमारे व श्री. किणी यांच्या हस्ते देण्यात आले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.


     कु.अपुर्वा ही नगरमधील सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलची इ. 7 वीची विद्यार्थीनी आहे. तिला कलाशिक्षक लक्ष्मण गुंजाळ, सुजाता पायमोडे, अशोक डोळसे यांच्यासह आजी, आजोबा, आई,वडिल यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे शाळेचे अध्यक्ष दामोदर बठेजा, मुख्याध्यापिका गीता तांबे आदिंनी अभिनंदन केले आहे.


     कु.अपुर्वा ही बारा बलुतेदार महासंघाचे सचिव सागर नांदुरकर यांची  मुलगी तर नांदुरकर ज्वेलर्सचे संचालक किशोर नांदुरकर यांची ती नात आहे. तिचे सर्व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم