President Of India: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन
President Of India: अहमदनगर (दि. 30/11/2023) :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत पूजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील,
अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.
राष्ट्रपतींचे श्री शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले व उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेकही केला.
अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला. श्री शनिशिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com