अहमदनगर : भिंगार येथून बाजारात भाजीपाला नेण्यास आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण
चोरटयांनी लांबवले. बेबी रतिलाल फिरोदिया (वय 62 वर्ष, रा.भिंगार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
ही घटना ८ डिसेंबरला घडली. अधिक माहिती अशी : शुक्रवारी (दि.८ डिसेंबर) बेबी फिरोदिया या
भाजीपाला खरेदीसाठी भिंगार बाजारात आल्या होत्या.
भाजी खरेदी करत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातून ६० हजार किमतीचे सोन्याचे दागिने लांबवले.
ही घटना लक्षात येताच त्यांनी भिंगार पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस
ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com