Satkar: नौदल दिनानिमित्त अनिल जोशी यांचा स्नेह 75 ग्रुपच्यावतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) - सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपले नौदल सदैव सज्ज असते. भारतीय नौसेनेच्या शौर्याची साक्ष देणारा हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी रत्नागिरी येथे नौदल दिनानिमित्त नौदलाच्या विविध चित्तथारक प्रात्याक्षिकांची पाहणी करुन नौदलाच्या शौर्याचे कौतुक केले. ही नौसैनिकांसाठी अभिमानास्पद बाब आहे. या दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्त नौदल अधिकारी अनिल जोशी यांचा सत्कार करुन नौदल सैनिकाप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला असल्याचे प्रतिपादन जयदीप मेडिकलचे संचालक ईश्वर सुराणा यांनी केले.
नौदल दिनानिमित्त सेवा निवृत्त नौदल अधिकारी अनिल जोशी यांचा स्नेह 75 ग्रुपच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निवृत्त पोलिस अधिकारी गुलाब गोरे, विश्वनाथ पोंदे, प्रमोदकुमार छाजेड, ईश्वर सुराणा, अभय गांधी आदि उपस्थित होते.
यावेळी अनिल जोशी यांच्याशी गप्पा मारतांना त्यांनी नौदलातील सेवा कार्याविषयी माहिती देतांना सांगितले. इंडियन नेव्ही डे म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो. 1971 साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात आला, विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडण्ट. 4 डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून भारतीय नौसेना ‘नौदल दिन’ साजरा करते.
यावेळी सर्वजण नौसैनिकांच्या खडतर सेवेचे अनुभव ऐकून अभिमान वाटला.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com