Pune Crime News | फ्लॅट खरेदी विक्री फसवणूक प्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल
Pune Crime News | पुणे : फ्लॅट विकत घेण्यासाठी तसेच फ्लॅटच्या बाबतीत कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी, आवश्यक ती कामे करण्यासाठी ५ लाख ३४ हजार रुपये घेऊन कोणतेही काम न करता फसवणूक
केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका वकिलावर गुन्हा दाखल केला आहे.अॅड. अमोल अनंतराव पाटील (रा. वारीस बिल्डिंग, एलोरा पॅलेस समोर, सातारा रोड)
असे या वकिलाचे नाव आहे. याबाबत फारुख मेहबुब शेख (वय ६२, रा. कोंढवा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार चैत्रबन लेकटाऊनमध्ये ८ एप्रिल २०२४ रोजी घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना राहते फ्लॅट विकत घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी अॅड. अमोल पाटील याला फ्लॅटचे कायदेशीर बाबी हाताळण्याकरीता तसेच सर्च रिपोर्ट काढणे,
खरेदीखत करुन देणे या सर्व कामाकरीता विश्वासाने ५ लाख ३४ हजार रुपये दिले होते.परंतु, त्यापैकी कोणतेही काम अॅड. पाटील याने केले नाही. तसेच पैसे परत मागितले तरी ते न दिल्याने फसवणूकीची फिर्याद देण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे तपास करीत आहेत
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com