Crime News | अपघाताचा बनाव करुन खूनाचा प्रयत्न आरोपीचा जामीन फेटाळला
नगर - दिनांक १६.०८.२०२४ रोजी सकाळी १० वा. चे दरम्यान जखमी शंतनु पोपट वाघ रा. नेवासा हा त्याचे स्टोन क्रशरकडे खडका फाटा येथे मोटार सायकलहून जात असतांना आरोपी यांनी त्याचा पूर्व वैमनस्यातून बोलेरो जीपने मार्केट यार्ड नेवासा येथून पाठलाग करुन त्यास छत्रपती संभाजीनगर रोडवर घाटगे पाटील शाळेजवळ जीपने धडक मारुन त्याचे खूनाचा प्रयत्न केला.
म्हणून नेवासा पोलीस स्टेशन येथे जखमी शंतनु यांचे खूनाचा प्रयत्न केला म्हणून दाखल झालेल्या गुन्हयात अटक आरोपी ज्ञानदेव उर्फ नारायण सुर्यभान लष्करे रा. पावन गणपती समोर नेवासा याने नेवासा येथील जिल्हा न्यायालयात जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला असता.
त्याची नुकतीच नेवासा येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी होवून आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. हरिभाऊ आर. वाघमारे यांनी फेटाळला. सरकारतर्फे अॅड व्ही. के. भोर्डे तर मुळ फिर्यादी यांचेतर्फे अॅङ सतिशचंद्र सुद्रिक यांनी काम पाहिले.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com