Top News

तोफखान्यात दत्त जयंती निम्मित सिद्धेश्वरमंडळाच्यावतीने महाप्रसाद संपन्न

 तोफखान्यात दत्त जयंती निम्मित सिद्धेश्वरमंडळाच्यावतीने महाप्रसाद संपन्न

तोफखान्यात दत्त जयंती निम्मित सिद्धेश्वरमंडळाच्यावतीने महाप्रसाद संपन्न




          नगर-येथील जंगूभाई तालीमच्या  सिद्धेश्वर तरुण मंडळ वतीने तोफखाना येथील संबोधी विद्यालय समोरील दत्त  मंदिरात गुरुदेव दत्त जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाला.


 

           जन्मोत्सवानिमित्त मंदिरांत महाआरती,अभिषेक,पूजा मंडळाचे अध्यक्ष राजूमामा जाधव यांच्या हस्ते करण्यात आली तर आज सकाळी दत्त याग व दुपारी महाप्रसाद संपन्न झाला यावेळी यावेळी राजूमामा जाधव,अभिमन्यू जाधव,ज्ञानेश्वर दौंडकर,आदिनाथ जाधवशिवदत्त पांढरे आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

 

           भाविकांची मंदिरांत दर्शनासाठी यावेळी गर्दी केली होती  महाप्रसादा मध्ये गोड शिरा,पुरीभाजी आदी पदार्थ होते.सर्व  कार्यक्रमाला परिसरातील भाविक मोठ्या संख्नेने उपस्थित होते.

 

          यावेळी अभिमन्यू जाधव म्हणाले मंडळाचे कार्य  जे का रंजले गांजले त्यासी म्हणू आपला,देव तेथेच जाणावा,साधू तिथीचे ओळखावा या प्रमाणे आम्ही याप्रमाणे धार्मिक कार्याप्रमाणे शैक्षणिक,सामाजिक,आरोग्य विषयक अशा अनेक उपक्रम सातत्याने अविरतपणे राबवित आहेत,अन्नदान,भजन-कीर्तन,प्रवचन अश्या अनेक माध्यमातून हिंदू जनजागृती करून  समाज सेवा करत असून या मानवजातीच्या असलेल्या संकटांमध्ये गरजवंतांना मदत हेच खरे आपले छोटे समाज कार्य आहे असेहि ते म्हणाले 


 

     दोन दिवसीय कार्यक्रमास भाविक,भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते , सकाळपासून ते रात्रीपर्यंत भाविक दर्शनासाठी गर्दी केली होती  हे मंदिर पुरातन क्षेत्र असून आहे गेली अनेक  वर्षे जाधव परिवार व मंडळाच्या वतीने  येथे उत्सव साजरा केला जातो 


Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم