दि.24 रोजी कथाकट्टाचे ‘भय इथले संपत नाही’ नाट्य प्रयोग
नगर - शनिवार दि. 24 मे रोजी ब्लॅक बॅाक्स क्रिएशन्स निर्मित, कथा कट्टा सादर करीत आहे. ‘भय इथले संपत नाही’ हा गुढ व भय कथाचा नाट्य अनुभव देणारा अभिवाचनाचा प्रयोग ऊर्जा रंग भवन, नगर येथे संध्याकाळी 7. 30 वा सादर होणार आहे.
या दीर्घाक प्रयोगामधे आशुतोष उकिडवे आणि नारायण धारप व रत्नाकर मतकरी या लेखकांच्या कथांचे अभिवाचन या प्रयोगात प्रभावीपणे केले जाते.
नेपथ्य, प्रकाश योजना आणि संगीताचा परिणामकारक उपयोग यामुळे प्रेक्षकांना प्रयोगाचा उत्तम अनुभव मिळतो. पात्रांच्या गरजेनुसार सुसंगत रंगभूषा आणि वेशभूषाचा वापर केला आहे. कलाकार वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांना खिळवून ठेवतात. या प्रयोगाची संकल्पना आणि दिग्दर्शन श्री. देवेंद्र भिडे यांनी केले आहे.
मानसी जोगळेकर, पूजा गिरी, डॅा. समीर डोलारे, पराग फडके,माधव सोमण, रोमा गिरी,मधूर डोलारे,राजा उत्तूरकर रेणुका भिडे, देवेंद्र भिडे, हे अभिवाचक कथा सक्षमपणे प्रेक्षकांनपर्यंत पोचवतात.
सचिन यंदे, आरोही डोलारे, अंतरा डोलारे यांची ही साथ मिळते. प्रकाशयोजना योगेंद्र साने, संगीत संयोजन - निरंजन देशपांडे, रंगभूषा - नरेंद्र वीर या अभिवाचन प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
यापुर्वी पुणे, मुंबई येथे प्रयोग झाले असून आता अहिल्यानगर मध्ये पहिला प्रयोग होत आहे.
‘भय इथले संपत नाही’ एक अनपेक्षित पध्दतीने भय व गूढ कथांचा नाट्यानुभव देणारा अभिवाचनाचा हा प्रयोग पाहण्यास प्रेक्षकांनी जरूर यावे. सादरीकरण कालावधी सलग 90 मिनिटे आहे. अधिक माहितीसाठी आणि तिकिटासाठी मो.8600244000 क्रमांकावर संपर्क साधावा.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com