तबला विद्यार्थ्यांचे संगीत परीक्षेत घवघवीत यश

तबला विद्यार्थ्यांचे संगीत परीक्षेत घवघवीत यश


नगर : दर्शक । 

एप्रिल-मे 2025 या सत्रात घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, तबला विषयात शिवरंजन सांगितलायच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश विद्यालयाच्या संगीत शिक्षणाची गुणवत्ता अधोरेखित करणारे आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री. लक्ष्मण डहाळे, श्री. प्रकाश शिंदे आणि सूरज शिंदे या अनुभवी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.




संगीत परीक्षेत प्रारंभीक स्तरात रवी धूप्पड, वीरेन नगरे आणि आदित्य फडणीस यांनी यश मिळवले. प्रवेशिका प्रथम परीक्षेत मल्हार वाघ, श्रीणंद कळेढोणकर, कैवल्य कुलकर्णी आणि आर्यन पाटील हे विद्यार्थी यशस्वी ठरले. प्रवेशिका पूर्ण परीक्षेत कृपाल शहापूरकर यांनी उज्वल यश मिळवले, तर विशारद पूर्ण परीक्षेत लौकिक घोडके यांनी सर्वाधिक गुण मिळवत केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला.




        यावेळी संगीत शिक्षक श्री. लक्ष्मण डहाळे म्हणाले, “या विद्यार्थ्यांनी फक्त वादनात निपुणता मिळवली नाही, तर त्यांनी तबल्याच्या प्रत्येक तालात भक्ती, शिस्त आणि मनःशांतीचा अनुभव दिला. संगीत हे केवळ प्रदर्शन नसून अंतर्मुख होण्याचा मार्ग आहे, हे त्यांनी आपल्या वादनातून दाखवून दिले. 




विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबरोबरच पालकांचा पाठिंबा, शिक्षकांचे समर्पण आणि विद्यालयातील पोषक वातावरण यांचे मोठे योगदान आहे. हे यश केवळ गुणांपुरते मर्यादित नसून, पुढील आयुष्यात सुसंस्कृत आणि समर्पित कलाकार घडवणारा टप्पा ठरणार आहे.