आजारपणात विरोधकांनी पसरवलेल्या अफवामुळे आ कर्डीले झाले भावनाविवश

Darshak
0

  आ शिवाजी कर्डीले पुन्हा सक्रिय,रोज घेणार जनता दरबार 

आजारपणात विरोधकांनी पसरवलेल्या अफवामुळे आ कर्डीले झाले भावनाविवश


     


नगर-आजारपणात विरोधकांनी पसरवलेल्या अफवा मुळे कार्यकर्ते गोंधळले गेले. पूर्वीचे राजकरण इतकया खालच्या थराला नव्हतेविरोधकांचे काम आहे टीका करायचे ते करतच रहाणारपण यामुळे कार्यकर्त्यांना खूप त्रास झाला हे सांगताना आ कर्डीले भावनाविवश  झाले,मी डॉक्टरला सांगितले मी कार्यकर्त्यांमध्ये राहणारा त्यांच्या अडीअडचणी २४ तास सोडवणारा आहे,गोळ्या पेक्षा मी त्याच्यामध्ये राहिलो तर लवकर बरा होईल त्यामुळे डॉक्टरांनी परवानगी दिली आहे व  पुन्हा सक्रिय  झालो आहे व  रोज जनता दरबार घेणार आहे.


 


          चिचोंडी पाटील उपबाजार समिती तसेच नेप्ती उपबाजार समिती येथील सात एकरात कांद्याचे शेडचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या भूमिपूजना संदर्भात नेप्ती उपबाजार समिती येथे आ.शिवाजीराव कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक आयोजीत केली होती त्यावेळी ते बोलत होते या बैठकीला बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले,संभाजी लोंढेभाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिग,बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे,उपसभापती रभाजी सुळअविनाश घुले उपस्थित होते.




        यावेळी कर्डीले म्हणाले चिंचोडी पाटील येथील उपबाजार समितीचा बीड जिल्हयातील शेतकऱ्याना फायदा होणार आहे. तसेच नेप्ती उपबाजार समिती जवळच असणाऱ्या सांत एकरा मध्ये कांदा मार्केटच्या विस्तरीकरण करण्यासाठी कांदा शेड उभारण्यात येणार आहे या दोन्ही कामाचे भूमिपूजन मंत्री जयकुमार रावलपालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या बाजार समिती मुळे आहिल्यानगरच्या विकासात भर पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मा आ.बबनराव पाचपुतेमा.खा.डॉ सुजय विखे पाटीलआ.विक्रम पाचपुते यांच्यासह जिल्हयातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.यावेळी अक्षय कर्डीले याचे भाषण झाले. 




          यावेळी बाजार समितीच्या मनिषा घोरपडे,रामदास सोनवणे,हरिभाऊ कर्डिले,संतोष म्हस्के,संजय गिरवले,भाऊ भोर,मधुकर मगर,सुधीर भापकर,दत्ता तापकीरे,राजु आंबेकर,सुभाष निमसे,धर्मनाथ आव्हाड,भाऊसाहेब ठोंबे,राजेंद्र बोथरा,निलेश सातपुते,हरीभाऊ कर्डीले,विलास शिंदे सुरेश सुंबे,विठ्ठल जपकर,शाम घोलप,बाजीराव हजारे,अशोक कोकाटे,बाबासाहेब काळे आदीसह मोठ्या संख्नेने कार्यकर्ते उपस्थित होते. प्राप्ताविक संतोष म्हस्केआभार सुधीर भापकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top