Ahmednagar College | दि.7 ऑक्टोबर रोजी रौप्य महोत्सवी रूथ बाई हिवाळे वक्तृत्व स्पर्धा
Ahmednagar College | नगर : दर्शक । - बी.पी.एच.ई.सोसायटीच्या अहमदनगर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या रूथबाई हिवाळे वक्तृत्व स्पर्धेचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. अहमदनगर महाविद्यालयात मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी ही स्पर्धा यंदा पार पडणार आहे.
मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत ही स्पर्धा पार पडणार असून कनिष्ठ महाविद्यालय गट (इ. 11 वी व इ. 12) साठी एक आणि (इ. 9 वी व इ. 10 वी) चा शालेय गट अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यावेळी आकर्षक स्मृती करंडकासोबतच रोख रक्कम हे या वर्षीच्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहे.
अहमदनगर महाविद्यालयाचे संस्थापक व प्रथम प्राचार्य रेव्ह.डॉ.भा.पा.हिवाळे यांच्या सुविद्य पत्नी, रूथबाई हिवाळे यांच्या स्मरणार्थ कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर ही स्पर्धा घेतली जाते. तर इंग्रजी माध्यमातून होणारी ही स्पर्धा प्रा.जोसेफ बार्णबस यांना समर्पित करण्यात येणार आहे.
आवडता विषय घेऊन यंदाच्या स्पर्धांमध्ये शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अहमदनगर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.नोएल एफ. पारगे, उपप्राचार्य प्रतुल पी.कसोटे तसेच पर्यवेक्षिका उज्वला एन.गायकवाड यांनी केले आहे.
तरी स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी खालील प्राध्यापकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रा.जे जी घुमरे 9834103241, प्रा.व्ही.व्ही.कसबेकर 9923608422, प्रा.डी.के.शिंदे 9545847108, प्रा.एस.बी.कांबळे 9922227286, संपर्क साधवा.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com