Parner Sports | थाळीफेक मध्ये गौरव शिरसाट तालुक्यामधून दुसरा
नगर- पारनेर शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेतील थाळीफेक या क्रीडा प्रकारात 14 वर्षे वयोगटातील जय मल्हार विद्यालय , पिपंळगावरोठा मधील इयत्ता 8वी चा विद्यार्थी गौरव शिरसाट याने तालुक्यामधून दुसरे स्थान पटकावले आहे.
त्याने तब्बल 18.30 मीटर थाळी फेकून दुसरे स्थान पटकावले व तो जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
29/30 सप्टेंबर 2025 रोजी प्रवरानगर लोणी येथे ही स्पर्धा होणार आहे.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री गरकळ सर,विद्यालयाचे मुख्याध्यापक सुंबरे सर, त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ,कर्मचारी,संस्था पदाधिकारी,ग्रामस्थ,
माजी विद्यार्थी,विद्यार्थिनी हितचिंतक, मुंबईकर यांनी या विद्यार्थ्यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन केले आहे व जिल्हा स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com