मगरुर पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची पत्रकार संघटनेची मागणी
श्रीरामपूर / (प्रतिनिधी):
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्यातच पत्रकारावर मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न सोबतच गलिच्छ शिवीगाळ आणी दमबाजी करण्याचा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सदरील प्रकार राहुरी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलीस शिपाई राहुल यादव यांनी केला असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी राहुरी तालुका पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
गुरुवार दि.२५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजे दरम्यान दैनिक सार्वमंथन चे संपादक अनिल कोळसे यांना, कणगर शिवारात बीड जिल्ह्यातील काही लोकांना जमावाने मारहाण झाल्याची माहिती मिळाली. याबाबत पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांच्याकडून माहिती घेत असताना, संबंधित तक्रारदाराबाबत माहितीचे चित्रीकरण कोळसे हे स्वतःच्या मोबाईलवर करत होते.
त्याचवेळी पोलीस शिपाई राहुल यादव यांनी पत्रकार कोळसे यांच्या दिशेने रागा रागाने येऊन त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावरही न थांबता त्यांनी गलिच्छ भाषेत शिवीगाळ व धमकीचे सूर लावत अंगावर धावूनजात भर पोलिस ठाण्यात गुंडागर्दी केली.
या घटनेला तेथे उपस्थित पोलीस कर्मचारी सुरज गायकवाड व बाबासाहेब शेळके यांनी अडवून हस्तक्षेप केला, तरीही यादव यांचा राग कमी न होता त्यांनी “पत्रकार गेला माझ्या…” असे अश्लाघ्य उद्गार काढले.
पोलीस ठाण्याच्या आवारातच घडलेल्या या प्रकारामुळे पत्रकार संघटना आक्रमक झाली असून, सदरील घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने उपलब्ध करून देत यादव या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली असून यावर सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्यात येईल असे पत्रकारांना पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी आश्वासन दिले.
राहुरी पोलीस ठाण्यात पत्रकाराचा मोबाईल हिसकावून शिवीगाळ करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली असून जिल्हाभरातील पत्रकार / संपादक संघटनांकडून सदरील बाबी तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
सदरील मगरुर तथा उर्मट पोलिस कर्मचाऱ्यावर तात्काळ उचित कारवाई व्हावी अन्यथा मोठे उग्र आंदोलन छेडले जाणार असल्याचे दिसून येत आहे.
निवेदन देतेवेळी ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी , संजय कुलकर्णी, प्रसाद मैड, गोविंद फुणगे,सुनिल रासने, मनोज साळवे, रियाज देशमुख,आकाश येवले, श्रीकांत जाधव, संजय संसारे, अनिल कोळसे, शरद पाचारणे, ऋषिकेश राऊत, सोमनाथ वाघ, अशोक मंडलिक,अय्यूब पठाण, कर्णा जाधव , सतिष फुलसौंदर, दीपक साळवे, सागर दोंदे, विलास गिर्हे, समर्थ वाकचौरे आदि पत्रकार उपस्थित होते.
संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास पत्रकार संघटनेमार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यातील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com