संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ता,पत्रकार,संपादक किशोर कालडा यांनी केलेल्या पन्नास वर्षाचा आदर्श कारकीर्द पाहून त्यांना राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष पद राष्ट्रीय अध्यक्ष रेणू हजारिका यांनी जाहिर केलेले आहे.
किशोर कालडा यांनी गेल्या पन्नास वर्षा पासून खेळ, पत्रकारिता, सामाजिक काम केले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार व पदे मिळाली आहेत.संगमनेर पासून त्यांनी राष्ट्रीय पत्रकार संघटनेत काम केलेले आहेत. ते संगमनेर मधून त्यांची पत्रकारिता सुरु केली.
त्यानंतर संगमनेर प्रेस, क्लब अध्यक्ष, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राच्या पत्रकार संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले, न्यूजपेपर असोशिएशन ऑफ इंडिया चे, जिल्हा पत्रकार संघटनेचे पद अधिकारी म्हणून काम केले.त्यांना महाराष्ट्राचा मानाचा आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
किशोर कालडा यांनी ४० वर्षापूर्वी पत्रकारितात जर्नालिझम चा कोर्स केला. ते राष्ट्रपती सन्मानित आहेत, पंतप्रधान सन्मानित आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्थळावर जागतिक लोकांच्या मुलाकाती घेतल्या आहेत. त्यांना अनेक वेळा दिल्लीत पदे देऊन बोलवत असे व दिल्लीत रहा परंतु संगमनेरच्या मातीला ते विसरले नाहित. म्हणूनच ते संगमनेरात राहिले. त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्रातून त्यांनाच मिळाले आहेत.
त्यांच्या सोबत पद अधिकारी म्हणून मध्यप्रदेश,बंगाल, ओरिसा,दिल्ली, गुजरात,उत्तर प्रदेश,आसाम,तेलंगणा, पंजाब,कर्नाटक,हिमाचल प्रदेश आदि प्रांतातून आहेत त्यांच्यासोबत ते काम करणार आहेत.सर्व थरातून त्यांचा अभिनंदन होत आहे-त्यांच कार्य बघून लंडन येथील आंतरराष्ट्रीय स्थळावर 'वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये त्यांची नौद झालेली आहे.
त्यांना यापूर्वी सुद्धा क्रीडा महर्षी आदर्श नगरसेवक,स्वामी विवेकानंद पुरस्कार, आदर्श पत्रकार,राष्ट्रीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, सावरकर रत्न पुरस्कार,समाज क्रांती पुरस्कार,साई रत्न पुरस्कार,मुंबई-नवी दिल्ली मध्ये अखिल भारतीय बोलीभाषेचे ते पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी पद भूषवला आहे.ते व्यापारी आहेत,पत्रकार आहेत,शेतकरी आहेत, सामाजिक सोशल वर्कर आहेत. त्यांच कार्य पाहून सर्व जातिधर्मात त्यांचा आदर आहे आणि सर्वांना घेऊन ते चालतात.त्यांच व्यक्तिमत्व सर्वांन बरोबर खूप चांगला आहे.त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com