Nagar Art Exhibition | 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान “आलेख्य” चित्रप्रदर्शन

Nagar Art Exhibition | 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान “आलेख्य” चित्रप्रदर्शन

Nagar Art Exhibition | 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान “आलेख्य” चित्रप्रदर्शन




 नगर,
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) आणि अहिल्या नगर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय “आलेख्य” चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाला आणि महाकुंभाच्या भव्यतेला समर्पित असेल.

प्रदर्शन 24 ते 26 सप्टेंबरदरम्यान महावीर कलादालन, अहिल्या नगर येथे भरविण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता होईल. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री. यशवंत डांगे, आयुक्त, अहिल्या नगर महानगरपालिका आणि श्री. विजयकुमार मुंडे, उपायुक्त, अहिल्या नगर महानगरपालिका असतील.




दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर यांनी सांगितलं की, या प्रसंगी विविध कलाकारांनी साकारलेली चित्रं प्रदर्शित केली जातील. यात देवी अहिल्याबाईंचं परोपकारी जीवन, समाजसुधारक कार्य आणि महाकुंभाची वैभवशाली परंपरा अधोरेखित केली जाईल.




हे चित्रप्रदर्शन कला प्रेमींसाठी दररोज सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत खुले राहील आणि प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असेल. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, “आलेख्य” हे प्रदर्शन भारतीय कला, संस्कृती आणि इतिहास जवळून जाणून घेण्याची आणि अनुभवण्याची एक आगळीवेगळी संधी ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या