Nagar Sahitya Awards | सौ. वसुधा देशपांडे यांना साहित्य गौरव पुरस्कार प्रदान
नगर - महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सावेडी उपनगर यांनी अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात पहिल्यांदाच राज्यस्तरीय युवा साहित्य- नाट्य साहित्य संमेलन 2025 भरवले होते. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. नामदार उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते सौ. वसुधा ज्ञानेश देशपांडे यांना मराठी साहित्यातील उदयोन्मुख लेखिका म्हणून साहित्य गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित केले आहे.
या प्रसंगी संमेलनाध्यक्षा कु.गौरी देशपांडे आणि स्वागताध्यक्ष डॉ. प्रशांत भालेराव तसेच मराठा विद्या प्रसारक समाजचे अध्यक्ष विश्वासराव आठरे पाटील आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सावेडी उपनगर शाखाचे प्रमुख कार्यवाह जयंतजी येलूलकर हे उपस्थित होते.
सौ. वसुधा देशपांडे यांनी दोन वर्षांपूर्वी कामिनी: एक गूढ रहस्य ही रहस्यमय कादंबरी प्रकाशित केली होती. या रहस्यमय कादंबरीस रसिक वाचकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. अवघ्या वर्षभरात ही कादंबरी महाराष्ट्रातील काना कोपर्यात जाऊन पोहोचली. मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी त्यांचा महाराष्ट्रातील पहिल्या रहस्यमय कादंबरी लेखिका या शब्दात उल्लेख केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेने सौ. देशपांडे यांच्या सारख्या नवोदित लेखिकेची दखल घेतली त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करत म सा प पुणे उपशाखा सावेडीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, प्रमुख कार्यवाह जयंत येलुलकर व प्रशांत देशपांडे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. राज्य स्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून सौ. वसुधा देशपांडे यांचे कौतुक होत आहे. लवकरच त्यांची दुसरी कादंबरी प्रकाशित होणार आहे ,अशी माहिती श्री. ज्ञानेश देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com