Nagar Palkhi | तुळजाभवानी मातेच्या पालखीचे नगर शहरात उत्साहात स्वागत

 Nagar Palkhi | तुळजाभवानी मातेच्या पालखीचे नगर शहरात उत्साहात स्वागत 

Nagar Palkhi | तुळजाभवानी मातेच्या पालखीचे नगर शहरात उत्साहात स्वागत


      



Nagar Palkhi | नगर : दर्शक । 

 नवरात्र उत्सव नगर शहरात  भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे.त्यामध्ये पलंग व पालखीचे शहरात आगमन झाल्यावर या उत्साहात अजून भर पडते व टिकठिकाणी धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.अशी माहिती पालखीचे मानकरी सागर भगत यांनी दिली 


         भगत म्हणाले पालखीचा मुक्काम हा नगर शहरात असतो  २२ सप्टेंबर पासून सुरु झालेल्या  नवरात्रोत्सवासाठी श्रीक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीची सीमोल्लंघनाची नवी पालखी बनवण्यासाठी सुमारे २०० वर्ष जुना असलेला पालखीचा पौराणिक दांडा वापरला जातो.



  राहुरीमध्ये या ऐतिहासिक दांड्यालानवी पालखी तयार करून लावण्यात येते. व नंतर पुन्हा तिची पुनर्बांधणी नगरजवळ असलेल्या हिंगणगाव मध्ये केली जाते तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्यापालखीचा मान गेल्या पूर्व पर्णपरा प्रमाणे आमच्या  भगत कुटुंबाकडे आहे. दरवर्षी नवी पालखी तुळजाभवानी देवीच्यादसर्‍याच्या सीमोल्लंघना साठी नगरमधून तुळजापूर कडे जाते.


 

        तुळजाभवानी देवीच्या पालखीचा नवा पाळणा बनवून झाल्यावर राहुरी येथून तुळजाभवानी देवीच्या पालखी सोहळ्यास ७ सप्टेंबर पासून सुरवात झाली आहे. ही पालखी सालाबादप्रमाणे राहुरीपारनेर व नगर तालुक्यातील ४० गावांमध्ये जाऊन नवरात्रीच्या दुसऱ्या  माळेस नगर सुधारत  येते. 


येथून ही पालखी श्रीक्षेत्र तुळजापूर कडे रवाना केली जाते. दसर्‍याच्यादिवशी सीमोल्लंघनासाठी सक्षात तुळजाभवानी देवीच या पालखीत विराजमान होत होते ज्या ४० गावांमध्ये ही पालखी जाते त्याठिकाणी यात्रा भरवण्यात येते. हजारो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होतात.



     तुळजाभवानी देवीच्या पालखीचा राहुरी,पारनेर व नगर तालुक्यात फिरून नगर शहरात आली  नालेगावबागडपट्टी कल्याण रोड शिवाजी नगर,सर्जेपुरा पोलीस हेडक्वार्टर,रामचंद्र खुंटभिंगार मार्गे बुऱ्हानगराला जाते  २९ सप्टेंबर ला पुन्हा पालखी नगराला वाणीनगरनिंबळक व नगर शहर सारसनगर,पाईपलाईन रोड येथे येऊन  तुळजापूरकडे रवाना १२ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला तुळजापूर  देवीच्या सीमोल्लंघन यासाठी श्री तुळजाभवानी मंदिराकडे प्रस्थान करेल.


 

      नगरमध्ये सर्जेपुरा येथे पालखीचे आगमन झाल्यावर येथील गुरुदत्त युवा  प्रतिष्ठानच्या वतीने तुळजा भवानीची पालखीची पूजा करण्यात येऊन  परिसरात पालखी मिरविण्यात आली. यावेळी शिव सोनवणे,सचिन उमाप,दीपककाळोखे,किरण साळवे,दीपक वडागळे,राजू ससाने,चेतन शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी परिसरातून मिरवणूक काढली यावेळी गुलालहळदी कुंकवाची उधळण करण्यात येऊन देवीचा जयघोष करण्यात आला,शेकडो वर्षपासून पालखी याठिकाणी येत आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या