Bhuikot Fort Nagar | जोशी बन्सीमहाराज परिवाराच्या वतीने पलंगाची पूजा व महाआरती संपन्न
Bhuikot Fort Nagar | नगर : दर्शक ।
तुळजा भवानीच्या पलंगाचे भूईकोट किल्ला येथे जॊशी यांच्या घरी आगमन झाल्यावर बन्सीमहाराज मिठाईवाले जोशी परिवाराच्या वतीने पूजा व महाआरती करण्यात आली,यावेळी आर्मड स्कोअर सेंटर अँड स्कुलचे ए सी रेकॉर्डेचे कमांडिंग ऑफिसर डी.एस. नेगी,मेजर राजेश मुंडेल,राजकुमार,संजय व साधना जोशी,कौशल जोशी,गोविंद जॊशी,मनोज जोशी,गोपी जोशी,आस्था जोशी,नुपूर जोशी,कृष्णा जोशी सह मोठ्या संख्नेने भाविक उपस्थित होते.
स्टेट बँक चौकातून वाद्याच्या गजरात पलंगाचे आगमन झाले.यावेळी महिला भाविकांनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला, पूजेनंतर सर्वाना महाप्रसाद नाश्ता,जलपान देण्यात आले. मोठ्या संख्नेने भाविक भक्त यावेळी उपस्थित होते.
यावेळी नेगी म्हणाले मी प्रथम आज दर्शन घेतले,जोशी परिवार २०० वर्षांपासून अशा धार्मिक व सामाजिक सामाजिक काम करतो त्यामुळे मला आनंद झाला आहे त्याच्यामुळे हे भाग्य मला मिळाले,हा पलंगाचा प्रवास ऐकून मी थक्क झालो आहे.
दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानक-यांनी किती कष्ट घेतले असतील याची आपण करू शकत नाही राज्याच्या दूरदूरच्या भागात येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे ते बजवतात

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com