Sant Nirankari Nagar | संत निरंकारी मंडळाच्या वतीने दि 28 रोजी महिला समागमचे पारनेर येथे आयोजन
Sant Nirankari Nagar | नगर : दर्शक । - संत निरंकारी मंडळाच्या नगर शाखेच्या वतीने सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने झोनलस्तरीय क्र.36 चे ‘महिला समागम’ आयोजन येत्या रविवार ता. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 ते 2:30 या वेळेत गणेश मंगल कार्यालय, पारनेर येथे करण्यात आले असून या सत्संग कार्यक्रमात प.आ.मीना मतेजी (चंद्रपूर निवासी) या उपस्थितितांना आध्यात्मिक मार्गदर्शन करतील.
महिला समागमात विविध भाषेत गीते, भजने, कविता तसेच सत्संग चे महत्व, सतगुरूची मानवी जीवनातील आवश्यकता, मानवी जीवनाचे उद्देश, जीवन जगण्याची कला आदी विषयांवर महिला आपले विचार-मनोगत मांडतील.या प्रसंगी काही संदेश प्रधान नाटिका सुद्धा सादर केल्या जातील. या महिला संत समागम साठी नगरशहर व जिल्ह्यासह बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आदि ठिकाणाहून मोठ्या संख्येने महिला भावीक उपस्थित राहणार असून त्यादृष्टीने तयारी केली जात आहे.
महिलांचे सक्षमीकरण व आध्यात्मिक उन्नतीच्या हेतूने आयोजित या निरंकारी महिला समागम मध्ये परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती जयसिंग बोरुडे, भास्करराव पिंपरकर तसेच मंडळाचे क्षेत्रीय प्रभारी, 36अ चे हरीश खूबचंदानी यांनी केली आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com