BurhanNagar | गावातून पालखी मिरवणूक संपन्न,यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती
BurhanNagar | नगर : दर्शक ।
तुळजापूरला नवरा
यावेळी पालखीचे मुख्य मानकरी पलंग पालखीचे मुख्य मानकरी व बुन्हाणनगर देवीचे पुजारी सुदाम जगन्नाथ भगत,ज्ञानेश्वर गोकुळ भगत,शिवराम उत्तम भगत,संतोष मधुकर भगत,देविदास भिमराव भगत,सागर बाळासाहेब भगत,दिपकप्रभाकर भगत,मंगेश शिवाजी भगत,वसंत गणपत भगत,निलेश बद्रीनाथ भगत आदींसह ग्रामस्थ व हजारो भाविक उपस्थित होते.
पालखीच्या देवी मंदिरास ५ प्रदक्षिणा झाल्यावर पालखीची बुऱ्हाणनगर गावातून वाजत गाजत देवीच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली भक्तिपूर्ण वातावरणात ही मानाची पालखी वाजत गाजत व गुलालाची उधळण करत ग्रामस्थांनी काढली होती . दर्शनास आलेल्या हजारो भाविकांनी आई राजा उदो उदो,सदानंदीचा उदो उदो चा जयघोष केला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.बुऱ्हाणनगर गावत पालखीचे स्वागत करण्यासाठी सर्व घरासमोर आकर्षक रांगोळ्या रेखाटून घरोघरी पालखीची भक्तिभावाने पूजा करण्यात आली.तत्पूर्वी तिसऱ्या माळेनिमित्त सकाळी देवीची विधिवत महापूजा पुजारी भगत परिवाराने केली.
पालखी मिरवणूक व यात्रेनिमित्त गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पालखीचा मान गेल्या एक हजाराहून अधिक वर्षांपासून बुऱ्हाणनगर च्या भगत परिवाराकडे आहे.श्री क्षेत्र तुळजापूर येथे विजयादशमीला तुळजाभवानी देवीचे सीमोल्लंघन नगरहून गेलेल्या याच पालखीमधून दरवर्षी होत असते.
भाविकांना पालखीचे दर्शन घेता यावे,यासाठी आमदार शिवाजी कर्डिले यांनी पालखीची मिरवणूक ट्रॅक्टरमधून काढली.यावेळी भाविकांनी पालखीचे स्वागत केले.यावेळी आमदार कर्डिले यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी भाविकांचे स्वागत केले.बुन्हाणनगर,कापुरवाडी,वारू



0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com