Tree Plantation Shrirampur | मीनाताईंचा ८३ वा वाढदिवस ८३ झाडे लावून साजरा

 Tree Plantation Shrirampur | मीनाताईंचा ८३ वा वाढदिवस  ८३ झाडे लावून साजरा

Tree Plantation Shrirampur | मीनाताईंचा ८३ वा वाढदिवस  ८३ झाडे लावून साजरा




श्रीरामपूर / प्रतिनिधी:

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्या व श्रीरामपूर रयत संकुलाचे चेअरमन मीनाताई जगधने यांचा ८३ वा वाढदिवस ८३ झाडे लावून साजरा करण्यात आला.

         पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील जयंती व मीनाताईंचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याचा योगायोग असल्याने डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयात मीनाताई जगधने यांच्या हस्ते विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. 

प्रमुख अतिथी म्हणून जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम, प्रा. प्रवीण बदाधे, प्रा.मुकुंद पोंधे, प्रा.संजय कांबळे, सुनील साळवे,सूर्यकांत सराटे आदी मान्यवर उपस्थित होते.

       विद्यालय परिसरात फुलांची,सावलीची,शोभेची आकर्षक झाडे लावली.

         यावेळी मुख्याध्यापक सुनील साळवे म्हणाले की, मीनाताई व त्यांचा संपूर्ण परिवार शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात अहोरात्र परिश्रम घेऊन योगदान देत आहे. सतत काम करत राहणे व चंदनासारखं झिजण्याचा त्यांचा गुण आहे. फोटो,पोस्टर, बॅनर,बडेजाव करून वाढदिवस साजरा करणं मीनाताईंना आवडणार नाही करीता त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम म्हणून ओळखला जावा म्हणून विद्यालयात त्यांचे वयोवर्षाईतके झाडे लावण्याचा विद्यालयाने हा सामाजिक उपक्रम राबविला आहे.

        मीनाताई चे वाढदिवस निमित्त आयोजित वृक्षारोपण उपक्रमाचे विद्यार्थी व पालक वर्गातून कौतुक होत आहे.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या