Rahata Satkar | कु.वैष्णवी वाघ हिने (NSQF) मध्ये तृतीय क्रमांक पटकविल्याबद्दल जाहीर सत्कार !
राहाता : (अजीजभाई शेख ) :
शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थान औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थीनी कु. वैष्णवी राजेंद्र वाघ या विद्यार्थिनीने
इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनेस(NSQF) यामध्ये ८०.४६ टक्के गुण मिळून तृतीय क्रमांक पटकावला त्याबद्दल श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर साहेब यांचे हस्ते तीचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्रीसाईबाबा संस्थान औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिर्डी चे प्राचार्य. दुनाके सर,मार्गदर्शक पाटील सर, जांभुळकर सर, परदेशी सर तसेच अनेक शिक्षक वर्ग कर्मचारी वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कु.वैष्णवी हीस प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य.दुनाके सर, पाटील सर, जांभुळकर सर, परदेशी सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तीच्या या यशाबद्दल विविध स्तरातून शुभेच्छा आणी अभिनंदन केले जात आहे.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार भगवान थोरात - शिर्डी
वृत्त प्रसिद्धी सहयोग
,समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com