अरणगावला संत बुवाजी बुवा संजीवन समाधी स्मृती सोहळा संपन्न

 अरणगावला संत बुवाजी बुवा संजीवन समाधी स्मृती सोहळा  संपन्न


 



नगर : दर्शक । 

                   अरणगाव येथे सद्गुगुरु बुवाजी बुवा महाराजांची संजीवन समाधी मंदिर आहे येथे स्वतःमहाराजांनी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापन केलेली आहे.  व अशी आख्यायिका आहे की बुवाजी बुवा महाराजांना स्वतः साक्षात भगवान विठ्ठल रुक्मिणी यांनी आषाढ शुद्ध द्वादशी येथे उपवास सोडायला येण्याचे वचन दिलेले आहे म्हणून हे तीर्थक्षेत्र महान आहे.


 

                संत बुवाजीबुवा महाराज यांच्या संजीवन समाधी स्मृती सोहळा  पित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला .पहाटे ५ वा.अभिषेक व समाधीची महापुजा आनंद कटारिया व अजिक्य हिरण यांच्या हस्ते झाली त्यानंतर  सकाळी १० ते १२ या वेळेत माधवदास महाराज राठी  यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला यावेळी राणीताई लंके संदेश कार्लेयांच्यासह मोठ्या संख्नेने भाविक उपस्थित होते.


 

             श्री बुवाजी महाराज यांचे समाधी मंदिर  हे  शिवकालीन जुन्या कलेतील बांधकाम असणारे आहे,बुवाजी बुवा यांनी संसार सोडून श्रीक्षेत्र वणी येथे सप्तशृंगी देवीचे 21 दिवस उपासना केली,देवीने दृष्टांत देऊन त्यांना १२ वर्षे  भगवत गीताचे पारायण व गुंडेगाव येथील शिवार तळे येथील वनामध्ये १२  वर्षाची साधना करायचे सुचवले त्याप्रमाणे महाराज या भागात आले तिथे त्यांनी आपला नित्य नेमाने  बारा वर्षे साधना केली तेथील महादेव मंदिर व डोंगरावरील खंडोबा मंदिर यांची  दर्शन,पूजा नित्यनेमाने करत असत व गीतेचे पारायण बारा त्यांनी वर्षे केले . दरवर्षी ग्रामस्थ मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करतात.


 

              पुढे बुवाजी बुवा अरणगाव येथे स्थायिक झाले,महाराजांना एका दिवशी स्वप्नात विठ्ठल रुक्मिणी यांनी मी आलोय तुझ्या भेटीला असा दृष्टांत झाला व नदीपत्रात या ठिकाणी माझी मूर्ती आहे,त्या आणून स्थापन कर असे सांगितले त्याप्रमाणे महाराजांनी मूर्ती नदी पात्रातून काढून आणून मंदिरात स्थापन केल्या व नंतर समाधी घेतली अशी  आख्यायिका आहे.


 

              प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला मंदिरात कीर्तन व खिचडीचा महाप्रसाद वाटप होतो,तसेच आषाढी एकादशी उत्सव रथयात्रा,द्वादशीला उपवास सोडायचा कार्यक्रम-महाप्रसाद ,अश्विन शुद्ध  नवमीला महाराजांचा समाधी दिवस तसेच अनेक उत्सव या ठिकाणी परंपरेप्रमाणे दरवर्षी साजरे केले जातात.



              कार्यक्रमाचे  आयोजन  पांडुरंग बुवाजीबुवा समाधी देवस्थान ट्रस्ट, व पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ अरणगाव ग्रामस्थ यांनी केले होते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या