Nagar Urban Bank | ठेवीदारांच्या 65 टक्के रकमा परत उर्वरित 35 टक्के परताव्याचे नियोजन सुरु

Nagar Urban Bank | ठेवीदारांच्या 65 टक्के रकमा परत उर्वरित 35 टक्के परताव्याचे नियोजन सुरु

Nagar Urban Bank | ठेवीदारांच्या 65 टक्के रकमा परत उर्वरित 35 टक्के परताव्याचे नियोजन सुरु

 




नगर : दर्शक । 

भारतीय रिझर्व बँकेने नगर अर्बन बँकेचा परवाना 4 ऑक्टोबर 2023 रोजी रद्द केला होता. गेल्या दोन वर्षाच्या काळात थकीत कर्जाची वसुली प्रक्रिया वेगाने राबवून 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत 2215 ठेवीदारांच्या 65 टक्के रकमा परत करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 35 टक्के रकमा परत करण्याचे नियोजन सुरू असून या रकमादेखील लवकरच परत करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.




बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाल्यानंतर बँकेच्या दैनंदिन खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने भाडेतत्त्वावर शाखा कार्यालय असलेल्या बँकेच्या सर्व शाखा बंद करण्याचा निर्णय बँक प्रशासनाने घेतला. त्याचबरोबर स्वमालकीचे कार्यालय असलेल्या शाखा बंद करून त्यांचे कामकाज मुख्य शाखेत वर्ग करण्यात आले. त्यामुळे बँकेच्या दैनंदिन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली.




याचबरोबर थकीत कर्जदारांकडील कर्ज वसुली, तारण मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव आदी प्रक्रिया वेगवान करण्यात आली होती. त्यामुळे जुलै 2025 अखेर 2215 ठेवीदारांना 50 टक्के रक्कम – 9616.03 लाख रुपये तर 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत 15 टक्के रक्कम – 2884. 63 रुपये परत करण्यात आले आहेत.




ज्या खातेदारांनी आपली केवायसी कागदपत्रे अद्याप बँकेकडे जमा केलेली नाहीत त्यांनी तात्काळ ही कागदपत्रे आपल्या नजीकच्या शाखेत अथवा मुख्यालयात जमा करावीत. याचबरोबर थकीत कर्जदारांनी आपली थकबाकी रक्कम तात्काळ बँकेकडे भरून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या