Snehalay | स्नेहालयच्या 36 वर्षांच्या वाटचालीचा दस्तऐवज – ‘फिटे अंधाराचे जाळे’ लवकरच वाचकांसमोर
नगर,
स्नेहालय संस्थेच्या मागील 36 वर्षांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस, या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे,म्हणजे *फिटे अंधाराचे जाळे*, या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी, 1 नोव्हेंबर रोजी आयोजिण्यात आले आहे.
माऊली सभागृह येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित या कार्यक्रमास प्रमुख संवादक म्हणून पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी , प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित भटकळ आणि सकाळ प्रकाशनाचे व्यवस्थापक अशुतोष रामगीर उपस्थित राहतील.
यावेळी पुस्तकाच्या *अप अगेन्स्ट डार्कनेस* च्या लेखिका मेधा देशमुख भास्करन आणि अनुवादिका सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांची प्रकट मुलाखत प्रा. डॉ.दया भोर घेतील. कार्यक्रम सर्वांसाठी निःशुल्क आणि खुला असून त्याच्या सन्मानिकांसाठी 7770027505 येथे संपर्काचे आवाहन स्नेहालय परिवारातर्फे अध्यक्षा जयाताई जोगदंड, डॉ.प्रीती भोंबे, डॉ.महेश मुळे यांनी केले आहे.
एड्स बाधितांसाठी भारतातील पहिला निवासी प्रकल्प उभारताना देहव्यापारातील महिला - बालकांचा क्रूर वापर थांबवताना, मानसिक आरोग्यापासून पर्यावरणापर्यंत महत्वपूर्ण विषयातील 27 तृणमूल सेवा प्रकल्प राबवताना तरुणाईने दाखवलेली असामान्य कल्पकता आणि धाडस, यावर या पुस्तकाने झोत टाकला आहे.
मूळ अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या मेधा देशमुख भास्करन त्यांच्या इतिहास संशोधनावर आधारित चरित्रात्मक इंग्रजी लेखनामुळे साहित्य विश्वात प्रसिद्ध आहेत. ऐतिहासिक तथ्यांवर आधारित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील चॅलेंजिंग डेस्टिनी, लाईफ अँड देत ऑफ छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई ही त्यांची पुस्तके इतिहास संशोधनाला नवी दिशा देणारी ठरली.
मेधा देशमुख यांनी 4 वर्षांच्या संशोधनानंतर स्नेहालयवर *अप गेस्ट डार्कनेस* ,हे पुस्तक लिहिले. त्याच्या अनुवादिका सुनंदा सदाशिव अमरापूरकर यादेखील मूळ नगरकर आहेत. त्यांची 30 हून अधिक अनुवादित आणि स्वतंत्र पुस्तके प्रकाशित आहेत. *खुलभर दुधाची कहाणी*, हे त्यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले.सकाळ प्रकाशनाने या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन केले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com