Football Nagar | "महादेवा" योजनेअंतर्गत १३ वर्षांखालील फुटबॉलपटू निवड चाचणीचे आयोजन
नगर, – जिल्हा फुटबॉल असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२५ दरम्यान “महादेवा” योजनेंतर्गत १३ वर्षांखालील फुटबॉल खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन अहिल्यानगर कॉलेज, अहिल्यानगर येथे करण्यात आले आहे.
या निवड प्रक्रियेतून पात्र ठरलेल्या खेळाडूंना १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई येथे लिओनेल मेस्सी या जागतिक कीर्तीच्या फुटबॉलपटूसोबत खेळण्याची अद्वितीय संधी मिळणार आहे. इच्छुकांनी https://forms.gle/ctCMRZ4FZDxwYEvA7 या लिंकद्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले आहे.
राज्यात फुटबॉल खेळाचा विकास व प्रसार करण्यासाठी क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “महादेवा” ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील १३ वर्षांखालील मुले व मुलींसाठी फुटबॉल खेळाडू निवड चाचण्यांचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर करण्यात येणार आहे.
संबंधित शाळांनी आपल्या शाळेतील १३ वर्षांखालील मुले व मुलींना ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता चाचणीस्थळी उपस्थित राहावेत. खेळाडूंनी बरोबर मूळ आधारकार्ड व जन्मप्रमाणपत्र आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष सूचना
काही कारणास्तव जर फॉर्म लिंक ओपन होत नसेल तरीही इच्छुक खेळाडूंनी काळजी न करता ग्राऊंडवर हजर रहावे आपण त्याठिकाणी फॉर्म भरून घेऊ
ज्ञानेश्वर खुरांगे जिल्हा क्रीडा अधिकारी अहिल्यानगर

 
 
 
 
 
 
 
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com