Nagar Crime | 'तू आमच्यात लाव-लाव्या करतो' म्हणत कुटुंबाला मारहाण
शहरातील केडगाव उपनगरात शुक्रवार (दि. १७ ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास दोन तरुणांनी ‘तू आमच्यात लाव-लाव्या करतो’ या कारणावरून संपूर्ण कुटुंबालाच लाथा-बुक्यांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली.
याप्रकरणी सलीम ईस्माईल पठाण (वय ३३, रा. शाहूनगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसर ओंकार निळफरांगे व अनिल नंदु सुरवसे (दोघे रा. शाहूनगर) यांच्याविरोधात कोतवाली पोलिसात अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदवण्यात आला आहे.
पहाटे दीडच्या सुमारास ओंकार निळफरांगे व अनिल नंदु सुरवसे (दोघे रा. शाहूनगर) हे त्यांच्याघरासमोर आले. त्यांनी पठाण यांच्या मुलाला उद्देशून शिवीगाळ करत ‘तू आमच्या लाव-लाव्या करतो’ असे म्हणत हुज्जत घातली.
पठाण यांनी या वागणुकीचा जाब विचारत समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही आरोपींनी सलीम पठाण, त्यांची पत्नी, भावजई आणि पुतण्या अशा संपूर्ण कुटुंबावरच हल्ला चढवला. लाथा-बुक्यांनी मारहाण करत ‘तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहेत.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com