‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’च्या प्रस्तावासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत मुदत

 ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’ च्या प्रस्तावासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत मुदत


‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’च्या प्रस्तावासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत मुदत



मुंबई,  :अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना’ सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आणि मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसांनी या योजनेंतर्गत सुधारित प्रस्ताव सादर करण्यासाठी विहित अटी व शर्तींची पूर्तता करून विहित नमुन्यातील अर्जासह पूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर (जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१) येथे १४ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत सादर करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.




अधिक माहिती  https://mdd.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निर्धारित दिनांकानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, याची संबंधित मदरशांनी नोंद घ्यावी. मदरशांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक – १४ नोव्हेंबर, २०२५




जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक  १५ डिसेंबर, २०२५ आहे. अधिक माहितीसाठी  जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे अथवा, दूरध्वनी: ०२२-२२६६०१६७, ई-मेल: dpomumbaicity@gmail.com यावर संपर्क साधावा असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या