Chichondi Patil | अतिवृष्टी पंचनामे करण्यास चिचोंडी पाटील मध्ये सुरुवात- सरपंच शरद पवार
नगर : दर्शक ।
सप्टेंबर महिन्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे चिचोंडी पाटील गावातील खरडून व वाहून गेलेल्या शेतीचे,विहिरीचे मंडळ अधिकारी,तलाठी भाऊसाहेब,कृषी सहाय्यक,सरपंच ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत पंचनामे सुरू आहेत. यावेळी कवठाचा मळा परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
सर्व शेतकऱ्यांनी विहीर व खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करून व संबंधित लागणारे पेपर तलाठी व सर्कल यांच्याकडे जमा करून शासनाने लवकरात लवकर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी.
व चिचोंडी पाटील येथील अतिवृष्टी अनुदानापासून वंचित असणाऱ्या 450 शेतकऱ्यांचे अनुदान शासनाने लवकरात लवकर जमा करावे अशी मागणी सरपंच शरदभाऊ पवार यांनी केली आहे

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com