पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य मंगेश जगताप यांना ‘बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड’

 पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य मंगेश जगताप यांना ‘बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड’

पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य मंगेश जगताप यांना ‘बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड’





नगर - पोदार इंटरनॅशनल स्कूल, अहिल्यानगर या शिक्षणसंस्थेने पुन्हा एकदा आपला लौकिक कायम ठेवला आहे. संस्थेचे प्राचार्य मंगेश जगताप यांना मुंबई येथे आयोजित ‘इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५’ या भव्य समारंभात ‘बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले.




       हा मानाचा पुरस्कार भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी आणि प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंत शिक्षकवर्ग व शैक्षणिक नेतृत्वाला प्रेरणादायी दिशा मिळाली आहे.




      प्राचार्य  मंगेश जगताप हे गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, आधुनिक शिक्षणपद्धतींचा अवलंब, मूल्याधिष्ठित शिक्षण व नवोन्मेषी उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पोदार इंटरनॅशनल स्कूल, अहिल्यानगरने शैक्षणिक निकालात, स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तसेच सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय यश मिळवले आहे.




       शैक्षणिक क्षेत्रात नावीन्य आणण्याच्या दृष्टीने त्यांनी ‘स्टुडंट सेंटरड एज्युकेशन’, डिजिटल क्लासरूम, स्किल-बेस्ड अॅक्टिव्हिटीज आणि जागतिक दर्जाच्या अध्यापन पद्धतींची अंमलबजावणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त करत आहेत.




        या मानाच्या पुरस्काराबद्दल संपूर्ण पोदार इंटरनॅशनल स्कूल परिवार, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक तसेच स्थानिक नागरिकांनी प्राचार्य मंगेश जगताप सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.



शाळेच्या वतीने सांगण्यात आले की – “हा सन्मान फक्त आमच्या प्राचार्यांचा नाही, तर प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे.”



      शिक्षण क्षेत्रात अहिल्यानगरचे नाव राष्ट्रीय स्तरावर उजळवणारा हा क्षण खरोखरच अभिमानास्पद ठरला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या