Fraud Crime Nagar | गृहकर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने प्राध्यापकाची अडीच लाख रुपयांची फसवणूक

गृहकर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने प्राध्यापकाची अडीच लाख रुपयांची फसवणूक

Fraud Crime Nagar | गृहकर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने प्राध्यापकाची अडीच लाख रुपयांची फसवणूक






नगर : दर्शक । 

एलआयसीमधून गृहकर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने प्राध्यापकाची अडीच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रा. सुधीर रामचंद्र बळे (वय ५३, रा. सुप्रिया अपार्टमेंट, पुनम मोतीनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार चेतन दत्तात्रय दांडेकर (रा. पुणे) यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



प्रा. सुधीर बळे यांनी वाघोली, पुणे येथे फ्लॅट खरेदी करण्यासाठी दांडेकर यांच्याकडून गृहकर्ज मंजूर करून घेण्याची मागणी केली होती. 



दांडेकरने काही कोरे चेक आणि कागदपत्रे मागितली आणि प्रकरण करण्यासाठी ५० हजार रुपये मागितले. विश्वासाने प्रा. बळे यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे चार कोरे चेक आणि ५० हजार रुपये ऑनलाईन स्वरूपात दिले. मात्र, काही आठवड्यांनीही कर्ज मंजूर झाले नाही. 



पैशाची तातडीने आवश्यकता असल्याने प्रा. बळे यांनी दुसऱ्या कर्जाचा मार्ग अवलंब केला आणि दांडेकरकडून दिलेली रक्कम परत मागितली. यावर दांडेकरने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, १२ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रा. बळे यांच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये डेबिट झाल्याचे समोर आले. 




चौकशी केल्यावर समजले की, दांडेकरने बळे यांचा एक कोरा चेक चिंचवड, पुणे येथील डीसीबी बँकेत जमा करून ही रक्कम काढली. फसवणूक लक्षात येताच प्रा. बळे यांनी दांडेकरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद लागल्याचे समोर आले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या