Molana Azad | स्वातंत्र्यसेनानी मौलाना आजाद यांचा देशाच्या फाळणीला विरोध होता - भैरवनाथ वाकळे

Molana Azad |  स्वातंत्र्यसेनानी मौलाना आजाद यांचा देशाच्या फाळणीला विरोध होता - भैरवनाथ वाकळे 

Molana Azad |  स्वातंत्र्यसेनानी मौलाना आजाद यांचा देशाच्या फाळणीला विरोध होता - भैरवनाथ वाकळे

नगर : दर्शक ।  
भारताला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर ज्या घडामोडी घडत होत्या त्यावर मौलाना आजाद यांची करडी नजर होती. आज घडणाऱ्या कोणत्या बाबींचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो हे ते समजून होते. देशाच्या फाळणीला त्यांनी कडाडून विरोध केला होता व तो शेवटपर्यंत कायम राहिला. त्यांनी इतर नेत्यांनाही फाळणी न करण्याची विनंती केली होती पण शेवटी जे नाही घडायला पाहिजे होते ते घडलेच. देशाची फाळणी झाली. 




देशात दंगली उसळल्या. माणूस माणसाकडे माणूस नाही तर जात म्हणून बघायला लागला हे मौलानांना सहन होत नव्हते. लोकांना शांत करण्यासाठी त्यांच्या मनातील फाळणीच्या दुःखाला व देशात पसरलेल्या दंगली व जातीवादाला संपविण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी मौलाना अबुल कलाम आजाद यांनी भरपूर प्रयत्न केले, असे प्रतिपादन मौलाना आजाद महोत्सव समितीचे अध्यक्ष भैरवनाथ वाकळे यांनी केले.






मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी,रहमत सुलतान फाउंडेशन व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने देशाचे पहिले शिक्षणमंत्री स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीनिमित्त मौलाना आजाद कैदेत असलेल्या अहमदनगर किल्ला येथील नेता कक्षात त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेस मौलाना आजाद महोत्सव समितीचे अध्यक्ष भैरवनाथ वाकळे यांनी पुष्पहार अर्पण केला. 



यावेळी रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर, अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान, अभिजीत वाघ, ॲड. हनिफ बाबूजी, जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद, वसीम सर, फैयाज अहमद, सामाजिक कार्यकर्ते साहेबान जहागीरदार, सईद खान, कलीम शेख, संजय भिंगारदिवे, सलीम सहारा, शब्बीर शेख, जावेद अब्बास तांबोळी, डॉ. इमरान शेख, तन्वीर चष्मावाला, आदिल शेख, जावेद मास्टर, अहमदनगर सोशल फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक नईम सरदार, ज्येष्ठ नागरिक संघाचे इस्माईल शेख, पत्रकार अफजल सय्यद, ठाकूरदास परदेशी, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे शाकीर अहमद, चंद्रकांत माळी, बापू बनकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सईद खान व संजय भिंगारदिवे यांनी देशभक्तीवर गीते सादर केली.


पुढे बोलताना भैरवनाथ वाकळे म्हणाले, मौलाना अबुल कलाम आझाद यांचा भारताच्या स्वातंत्र्यामध्ये असलेला सहभाग व देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी शिक्षणासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या अनेक घटनांचा उल्लेख करत उहापोह केला. व देशाची फाळणी होऊ नये यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद यांनी किती प्रयत्न केले. याचे त्यांनी अनेक उदाहरणे सांगितली. तसेच त्यांच्या ऊर्दूमधे असलेले 'गुबारे खातीर' या पत्रसंग्रहाची जानेवारीमधे मराठी व हिंदी अनुवाद प्रसिद्ध करणार असल्याची घेषणा वाकळे यांनी यावेळी केली.



प्रास्ताविक करताना आबीद दुलेखान यांनी मखदूम सोसायटीच्या माध्यमातून  मौलाना आजाद जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता सप्ताहमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.



यावेळी मनोगत व्यक्त करतांना युनुस तांबटकर, साहेबान जहागीरदार, डॉ. इमरान शेख, संजय भिंगारदिवे, सलीम सहारा, शब्बीर शेख, अफजल सय्यद, वसीम सर, नईम सरदार यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.


सूत्रसंचालन आबिद खान यांनी केले तर आभार आरिफ सय्यद यांनी मानले. कार्यक्रमास शहरातून मोठ्या प्रमाणात इतिहासप्रेमी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या