RSP | आरएसपी अधिकारी रा.ज धस यांना पदोन्नती
RSP | नगर – महाराष्ट्र राज्य पोलीस गृह विभाग, शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण दलांतर्गत कार्यरत असलेल्या आरएसपी अधिकारी मा. रा .ज धस यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पदोन्नतीसह ‘थ्री-स्टार’ लावून सन्मानीत करण्यात आले.
अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे, जिल्हा शिक्षणाधिकारी सौ. संध्या गायकवाड, शहर वाहतूक निरीक्षक मा. बाबासाहेब बोरसे, पोलिस मुख्यालय आरपीआय मा. उमेश परदेशी तसेच नाशिक विभाग समादेशक सिकंदर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित आरएसपी अधिकाऱ्यांच्या साक्षीने हा मानाच्या थ्री स्टरने सन्मानित करण्यात आले.
अहिल्यानगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या विशाल असल्याने आरएसपी कार्यक्षमता वाढविण्यासाठी नाशिक विभागाचे समादेशक सिकंदर शेख यांनी जिल्ह्याचे उत्तर व दक्षिण असे दोन विभागात विभाजन केले. जिल्हा समादेशक मा. प्रकाश मिंड यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते कोषाध्यक्षपदासाठी रा .ज धस यांची निवड करण्यात आली.
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नागापूर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात प्राचार्य मा. रावसाहेब सातपुते, शिक्षकवर्ग व आरएसपी कॅडेट यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन रा .ज धस यांचा सन्मान केला.
रा .ज धस यांनी वाहतूक प्रशिक्षण, अपघात प्रतिबंध, प्रथमोपचार, पद- संचलन सिग्नल पीटी, नागरी व आपत्कालीन सेवांसाठी विद्यार्थ्यांमध्ये मनोधैर्य व जागरूकता निर्माण करून सुरक्षित, सदृढ नागरिक घडविण्याचे महत्व पटवून देत आहे. “ आमचे जीवन सेवेसाठी " हेच आरएसपीचे ब्रीद” असे मत त्यांनी व्यक्त केले.
सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना रा ज धस यांनी प्राचार्य व शिक्षकांना भारतीय संविधानाची प्रति भेट देऊन आपले ऋण व्यक्त केले. रोड सेफ्टी प्रेट्रोलिंग आणि सोशल डिफेन्सचे कार्य प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. दादाभाऊ कळमकर, शांताराम गाडे पाटील, बबनराव कातोरे, प्राचार्य सातपुते, ज्येष्ठ शिक्षक अरुण ससे, सौ. संगीता गाडेकर सौ. आशा भोगे, मा. शंकर बारस्कर, मा. हेमंत पवार, सौ. अशा गुंड, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मा. चारुदत्त देशमुख व मा. सुदाम गव्हाणे यांनी रा .ज धस यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आरएसपी कमांडर कुमारी सानवी साळुंके हिने केले तर कुमारी खुशी कुर्टे हिने उपस्थितांचे आभार मानले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com