Nagar Shivsena | शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने अभिवादन
नगर : दर्शक
आज देशामध्ये परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. आपल्या राजकीय अजेंड्यासाठी देशाला अस्थिर करण्याचे डाव काही प्रवृत्ती राबवित आहेत. मात्र देशाला स्थिर ठेवण्याची ताकद देशाच्या संविधानामध्ये आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच देशाचे अखंडत्व टिकवू शकते. जनतेच्या पैशातून अहिल्यानगर शहरामध्ये आयुष रुग्णालयाची उभारणी झाली आहे. या वास्तूला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाकरे शिवसेनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी काळे, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, उपजिल्हाप्रमुख दीपक भोसले, उपशहर प्रमुख मनोज गुंदेचा,
कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख विलास उबाळे, कामगार सेनेचे शहर प्रमुख गौरव ढोणे, महिला आघाडीच्या उषाताई भगत, शैलाताई लांडे, संपदाताई म्हस्के, प्रतीक बारसे, रिपब्लिकन पार्टी निकाळजे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख बंडू आव्हाड, संदीप वाघमारे, प्रदीप सकट, विकास उमप, शंकर आव्हाड, परमेश्वर बडे,
उपशहर प्रमुख सुनील भोसले, उपशहर प्रमुख दिलदार सिंग बीर, गणेश शिंदे, आकाश अल्हाट, दीपक दोजत, मिलन सिंग, मुकेश गावडे, विनोद दिवटे, निलेश झवेरी, विजय शिरसाट आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा संदेश समाजाला दिला. शिक्षणाच्या बाबतीत आपण पुढे आलो आहोत. मात्र आज देशामध्ये ज्या पद्धतीने देश तोडण्याच्या कृती सुरू आहेत या कृतींच्या विरोधात लढण्यासाठी त्यांच्या विचारांप्रमाणे संघटित होऊन संघर्ष करण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com