ZP Election Nagar | जिल्हा परिषद दरेवाड़ी गटातून किरण गांगर्डे यांचा अर्ज दाखल

 जिल्हा परिषद दरेवाड़ी गटातून किरण भास्कर गांगर्डे यांच्या उमेदवारीसाठी समर्थकांचे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल 

ZP Election Nagar |




             


  नगर- जिल्हापरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून जिल्हा परिषद  दरेवाड़ी गटातून किरण भास्कर गांगर्डे  हे  प्रबळ दावेदार असून त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यामुळे विजयी होण्याची खात्री आहे, 



जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने मुलाखती येथील घेण्यात आल्या.यावेळी मुलाखतीसाठी मोठ्या प्रमाणावर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची उपस्थिती राहिली.


ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत शक्ती प्रदर्शन करत त्यांनी अर्ज दाखल केला यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती 


              किरण  गांगर्डे हे पहिल्यापासून शिवसेनेशी एकनिष्ठ असून ते उद्योजक आहेत त्यांचा जनसंपर्क दांडगा असून सामाजिक कामामुळे ते परिचित आहेत 365 दिवस  २४ तास सदैव जनतेसाठी तत्परअसलेलं अशी त्यांची ओळख आहे.


ZP Election Nagar |



मुलाखतीसाठी खासदार निलेश लंके,माजी मंत्री प्राजक्त तनपुरे,उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे,काँग्रेसचे संपत म्हस्केकिसनराव लोटके ,माधवराव लामखडे,बाबासाहेब गुंजाळ,उद्धवराव दुसुंगे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


        त्यांना उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांनी यावेळी  मागणी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या