आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रकाश पोटे यांचा अर्ज दाखल
नगर-जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून अहिल्यानगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने मुलाखती घेण्यात आल्या यामध्ये तालुक्यातील सहा गट व बारा गणांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांनी जोरदार ताकद दाखवली. यामध्ये चिचोंडी पाटील जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी (SC Category) आरक्षित असून येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांच्या उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केले.
रेल्वे स्टेशन येथील यश ग्रँड हॉटेल येथे झालेल्या मुलाखतीसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती राहिली.इच्छुक उमेदवारांनी ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत शक्ती प्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले.या मुलाखतीसाठी खासदार निलेश लंके,माजी मंत्री प्राजक्त तनपुरे,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे,काँग्रेसचे संपत म्हस्के,किसनराव लोटके सर,माधवराव लामखेडे,विक्रम राठोड,बाबासाहेब गुंजाळ,उद्धवराव दुसुंगे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सामान्य जनतेच्या समस्या शासन दरबारी नेहमीच मांडणारे, संघर्षातून पुढे आलेले कार्यकर्ते म्हणून प्रकाश पोटे यांच्या यांचा जनसंपर्क प्रचंड असून त्यांना उमेदवारी मिळावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.यावेळी सरपंच शरद पवार आणि प्रकाश पोटे यांनी सांगितले की, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रकाश पोटे यांना उमेदवारी मिळाल्यास विकासाचा झंझावात निर्माण होईल.संघर्षातून आलेल्या व्यक्तीलाच जनतेच्या अडचणीची जाणीव असते.
प्रकाश पोटे यांच्याबरोबर चिचोंडे पाटीलचे सरपंच शरद पवार,निंबोडीचे माजी माजी सरपंच बाबुराव दादा बेरड, चंदूकाका पवार, पैलवान भाऊसाहेब धावडे, शिवाजी काका बेरड, शरद चंद्रभान बेरड, राजू बेरड, बापूसाहेब कुलट, जालिंदर वाघ, वैभव कोकाटे, अशोक आवारे, विश्वास बेरड, संकेत बेरड, दत्ता बनसोडे, संदीप खामकर, युवराज हजारे, संदीप बेरड, किसन पोटे, मोहन काळे आदी उपस्थित होते

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com