मानसिक स्वास्थ्य विषयावर प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांचे व्याख्यान
नगर : दर्शक
आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व अधिकच वाढले असून याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांचे “मानसिक स्वास्थ्य” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम श्री अरुणराव फाळके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, अहिल्यानगर तसेच अरुणोदय नेत्रालय (अहिल्यानगर व कर्जत) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. असे ट्रस्टचे प्रमुख नेत्र तद्न्य डॉ. दिलीप फाळके, व भूल तद्न्य डॉ. दीपाली फाळके यांनी म्हटले आहे.
सदर व्याख्यान शनिवार, दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.30 ते 8.00 यावेळेत होणार आहे. कार्यक्रमाचे ठिकाण माऊली संकुल, सावेडी रोड येथील सभागृह असे आहे. कार्यक्रम वेळेत सुरू होण्यासाठी सर्व उपस्थितांनी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सभागृहात आसनस्थ व्हावे, अशी नम्र विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.
कार्यक्रम सर्वासाठी खुला व मोफत असला तरी या कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी मोबाईल क्रमांक 9146112059 वर आपले नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन व तज्ज्ञांचे विचार ऐकण्याची संधी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
x

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com