Residencial College | मोबाईलचा अभ्यासासाठी सकारात्मक वापर करा, दिशाभूल टाळा – राजेंद्र शिंदे

 Residencial College | रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात 

Residencial College | मोबाईलचा अभ्यासासाठी सकारात्मक वापर करा, दिशाभूल टाळा – राजेंद्र शिंदे







Residencial College |  नगर : दर्शक । 
 शिक्षणाच्या बदलत्या युगात मोबाईल हे दुधारी अस्त्र आहे. या अस्त्राचा विद्यार्थ्यांनी जीवनाला योग्य वळण देण्यासाठी अभ्यास उपयोगी गोष्टींसाठी पुरेपूर लाभ घ्यावा, मात्र इतर अनावश्यक गोष्टींसाठी वापर करू नये, असा मौलिक सल्ला पी. आर. एस. सोल्युशन या खाजगी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी अहिल्यानगर येथील रेसिडेन्सी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी दिला.



अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या रेसिडेन्सी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आष्टीचे आमदार सुरेश धस, पुणे येथील पी. आर. एम. सोल्युशन खाजगी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे, संस्थेचे सहसचिव मुकेश मुळे, खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे, ज्येष्ठ विश्वस्त जी. डी. खानदेशे, विश्वस्त जयंत वाघ, विश्वस्त राजेंद्र मोरे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे, उपप्राचार्य डी. जी. वांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.



आजच्या बदलत्या युगात मोबाईल हे आधुनिक अस्त्र असून विद्यार्थ्यांनी सखोल ज्ञान मिळवण्यासाठी मोबाईलचा पुरेपूर वापर करावा, मात्र इतर गोष्टींचा वापर टाळावा, असेही शिंदे यांनी सांगितले. आधुनिकरणाच्या काळात रोबोटचा वापर वाढत जाणार असल्याने भविष्यात माणसाच्या हाताला काम मिळणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.



आमदार सुरेश धस यांनी आपण या विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्याची कबुली देत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळ व छंद जोपासावेत, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास साधून विविध क्षेत्रांत नाव कमवावे, असेही त्यांनी शेवटी नमूद केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विजयकुमार पोकळे यांनी केले, तर सूत्रसंचालन धनंजय म्हस्के यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.



स्नेहसंमेलनानिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन, चित्रकला, हस्तकला प्रदर्शन, फूट अँड सॅंडल डेकोरेशन तसेच रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयातील शैक्षणिक नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या