New Arts College | स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा अविष्कार - ॲड. विश्वासराव आठरे पाटील

 New Arts College | स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा अविष्कार - ॲड. विश्वासराव आठरे पाटील

New Arts College | स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा अविष्कार - ॲड. विश्वासराव आठरे पाटील

 





नगर : दर्शक । 
  स्नेहसंमेलनाचा उद्देश हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन व वाव देणे हा असतो त्यामुळे शालेय महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनात या सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं त्यामुळे अभ्यासाच्या धामधुमीत त्यांच्यातील सृजनशीलता अभिव्यक्त होण्यासाठी स्नेहसंमेलन महाविद्यालया मधून होणे गरजेचे आहे या संमेलनांमधून आपल्या देशातील अनेक देशभक्त महान विभूतींच्या आदर्शांवर नवीन पिढी वाटचाल करण्यासाठी हा सोहळा मार्गदर्शक व प्रेरक आहे असे प्रतिपादन न्यू आर्ट्स कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील यांनी केले. 



            न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शिवशाहीर पृथ्वीराज माळी हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील हे होते यावेळी विचारपिठावर, सहसचिव मुकेश मुळे, खजिनदार ॲड  दीपलक्ष्मी  म्हसे,  विश्वस्त जयंत वाघ, सदस्य अरुणाताई काळे, निर्मलाताई काटे, राजेंद्र मोरे, अलकाताई जंगले, कॅप्टन चौधरी साहेब, राधाकृष्ण आढाव, संस्था निरीक्षक प्रा .उत्तमराव राजळे, हरिभाऊ जावळे, प्राचार्य डॉ .बाळासाहेब सागडे, उपप्राचार्य डॉ अनिल आठरे, प्रा कल्पना कानवडे, प्रा सुभाष गोरे, प्रा .जयश्री हापसे,  बबन साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.



       यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा .कल्पना कानवडे यांनी केले यावेळी कार्याध्यक्ष प्रा.जयश्री हापसे यांनी महाविद्यालयाचा अहवाल वाचन केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर मिळवलेल्या विविध स्पर्धा परीक्षा ंमध्ये त्यांना जे उत्तुंग यश प्राप्त झाले त्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांचा यावेळी उपस्थित मान्यवर व पाहुण्यांच्या हस्ते यथोचित सन्मान गौरव करण्यात आला. गुणवंत यशवंत प्राध्यापक शिक्षक यांचाही सन्मान सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी हे कनिष्ठ महाविद्यालयाचे देदीप्यमान यश पाहून माननीय प्राचार्य उपप्राचार्य व पर्यवेक्षक यांचे कौतुक केले. 




        प्रमुख अतिथी शिवशाहीर पृथ्वीराज माळी यांनी यावेळी शाहिरी कार्यक्रम सादर करत आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात सांगितली की लोकशाहीरी हा लोकपरंपरेचा सोहळा आहे शाहिरी हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असून इतिहासाचे व पराक्रमाचे पोवाडे कथन करण्यासाठी हा प्रकार महत्त्वाचा आहे 



समाजाला प्रबोधित करताना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरा हस्तांतरित करताना त्यामुळे सांस्कृतिक सातत्य टिकून राहते आधुनिक काळामध्ये शाहिरी आणि लोककला सामाजिक संदेश देण्याचे आणि लोककला एकत्र आणण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांचं व मूल्यांचं जतन करण्यासाठी या लोककला महत्त्वाचे प्रतीक आहेत शाहिरी मधून आपल्याला शक्ती आणि चैतन्य प्राप्त होते आणि या चैतन्य आणि शक्तीच्या जोरावर शिवछत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली असा हा सुंदर कार्यक्रम आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाने या किशोरवयीन मुलांसाठी ठेवला महाविद्यालयाचे व संस्थेचे यावेळी त्यांनी कौतुक केले व आपला शाहिरी कार्यक्रम सादर केला. 



        कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव विश्वासराव आठरे पाटील यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की सध्या स्नेहसंमेलनाची स्थिती बदलत आहे त्याची स्वरूप बदलत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मप्रगटीकरणाला संधी देण्यासाठी अशी सोहळे होणं सध्या गरजेचं आहे नवीन पिढी मधील नवीन नेतृत्व निर्माण करण्यासाठी समाजाला समाज प्रबोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपक्रमशील बनवण्यासाठी आपल्याला



 अशा कार्यक्रमांची आज नितांत आवश्यकता आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व घडली जातात असे त्यावेळी ते म्हणाले तसेच त्यांनी त्यावेळी महिलांचं शिक्षण सबलीकरण हे किती गरजेचं आहे यावरही प्रकाश टाकला असून उपेक्षित वर्गाकडे आपण लक्ष देणं सध्या गरजेचे असून त्यांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे असेही यावेळी त्यांनी नमूद केले. 



असे हे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व स्नेहसंमेलन राष्ट्रीयत्वाची उंची वाढवतात पुढच्या पिढीला घडवण्यासाठी कृतिशील विचार देण्याची आज नितांत गरज आहे असे ते म्हणाले व यशवंत गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व न्यु आर्ट्स कनिष्ठ महाविद्यालयाच्या या देदीप्यमान , उज्वल परंपरेचे कौतुक केले. 



          यावेळी कार्यक्रमाचे आभार सुभाष गोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद यांनी परिश्रम घेतले यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या