Top News

Rahuri Election | राहुरीत रंगणार मोठी लढत! अक्षय कर्डिले विरुद्ध तनपुरे?

 Rahuri Election | राहुरीत रंगणार मोठी लढत! अक्षय कर्डिले विरुद्ध तनपुरे?



राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपने आपला उमेदवार जाहीर केला असून, दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पश्चात त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.



शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कर्डिले कुटुंबाचा मतदारसंघावर असलेला प्रभाव लक्षात घेता, पक्षाने वारसदाराला संधी देत परंपरा कायम ठेवली आहे.



दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्याकडूनही जोरदार आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी न होता चुरशीची होणार, असे संकेत मिळत आहेत.मागील काही काळापासून राष्ट्रवादी विरोधी भूमिका घेतल्यामुळे तनपुरे नेमके काय करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.  



राहुरी मतदारसंघात याआधीही शिवाजीराव कर्डीले आणि प्राजक्त तनपुरे यांच्यात थेट लढती पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा या दोन राजकीय घराण्यांमध्ये संघर्ष रंगण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.



आगामी निवडणुकीत स्थानिक समीकरणे, पक्षनिष्ठा आणि सहानुभूतीची लाट या सर्व घटकांचा मोठा प्रभाव दिसून येणार असून, मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم