Nagar Police | मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने १९ अधिकारी बदलले; पोलिस दलात नवी मांडणी
अहिल्यानगर, ता. 12 : जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय पातळीवर महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले असून, १९ पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जारी केले आहेत. जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या शिफारशीवरून ही खांदेपालट करण्यात आली आहे.
या बदल्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची शिर्डी येथील साई मंदिर सुरक्षा विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. तर शहरातील महत्त्वाच्या कोतवाली पोलिस ठाण्याची जबाबदारी नितीन देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच तोफखाना पोलिस ठाण्याचे नवे निरीक्षक म्हणून बालाजी वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार जगदीश छबूराव भांबळ यांची तोफखाना पोलिस ठाण्यातून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. रवींद्र नरसिंग देशमुख यांना नियंत्रण कक्षातून राहुरी पोलिस ठाण्यात, विलास सहादू पुजारी यांना पाथर्डी पोलिस ठाण्यातून मानव संसाधन विभागात, तर संभाजी अभिमन्यू गायकवाड यांना कोतवाली पोलिस ठाण्यातून दक्षिण विभागात नियुक्त करण्यात आले आहे.
याशिवाय किरण बाजीराव शिंदे यांची श्रीगोंदे पोलिस ठाण्यातून एचटीयू विभागात, संजय राजाभाऊ ठेंगे यांची राहुरीहून श्रीगोंदे पोलिस ठाण्यात, तर नितीन भास्कर देशमुख यांची श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातून कोतवाली पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
आनंद अशोक कोकरे यांना मानव संसाधन विभागातून पाथर्डी पोलिस ठाण्यात, प्रताप पांडुरंग दराडे यांना नियंत्रण कक्षातून नेवासे पोलिस ठाण्यात आणि बाबासाहेब दादू बोरसे यांना शहर वाहतूक शाखेतून घारगाव पोलिस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे.
तसेच महेश विष्णू पाटील यांची नियंत्रण कक्षातून शहर वाहतूक शाखेत, दीपक पुंडलिक सरोदे यांची राहाता पोलिस ठाण्यात, बालाजी मदनराव वैद्य यांची एचटीयू विभागातून तोफखाना पोलिस ठाण्यात आणि हनुमान लहानू गायकवाड यांची कर्जत पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्येही फेरबदल
जिल्हा पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांमध्येही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. युवराज अर्जुनराव आठरे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून लोणी पोलिस ठाण्यात, माणिक भाऊसाहेब चौधरी यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेत, तर जगदीश मुलगीर यांची भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.
याशिवाय तेजश्री विठ्ठल थोरात यांची कोतवाली पोलिस ठाण्यातून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आणि हेमंत शिवाजी थोरात यांची घारगाव पोलिस ठाण्यातून एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
या व्यापक खांदेपालटीमुळे जिल्ह्यातील पोलिस प्रशासन अधिक गतिमान व प्रभावी करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
| क्र. | पोलिस अधिकारी यांचे नाव | सध्याचे नेमणुकीचे ठिकाण | बदली / नेमणुकीचे ठिकाण |
|---|---|---|---|
| 1 | पोनि/ जगदीश छबूराव भांबळ | तोफखाना पो. ठाणे | नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर (अति. कार्य. पोलिस उप अधीक्षक - मुख्यालय) |
| 2 | पोनि/ रवींद्र नरसिंह देशमुख | नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर | राहुरी पो. ठाणे |
| 3 | पोनि/ विलास सहादू पुजारी | पाथर्डी पो. ठाणे | मानवसंसाधन विभाग, अहिल्यानगर |
| 4 | पोनि/ संभाजी अभिमन्यू गायकवाड | कोतवाली पो. ठाणे | द.वि.प., अहिल्यानगर |
| 5 | पोनि/ किरण बाजीराव शिंदे | श्रीगोंदा पो. ठाणे | एच.टी.यू., अहिल्यानगर |
| 6 | पोनि/ संजय राजाभाऊ ठेंगे | राहुरी पो. ठाणे | श्रीगोंदा पो. ठाणे |
| 7 | पोनि/ नितीन भास्कर देशमुख | श्रीरामपूर शहर पो. ठाणे | कोतवाली पो. ठाणे |
| 8 | पोनि/ आनंद अशोक कोकरे | मानवसंसाधन विभाग, अहिल्यानगर | पाथर्डी पो. ठाणे |
| 9 | पोनि/ प्रताप पांडुरंग दराडे | नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर | नेवासा पो. ठाणे |
| 10 | पोनि/ बाबासाहेब दादू बोरसे | शहर वाहतूक शाखा, अहिल्यानगर | घारगाव पो. ठाणे |
| 11 | पोनि/ महेश विष्णू पाटील | नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर | शहर वाहतूक शाखा, अहिल्यानगर |
| 12 | पोनि/ दीपक पुंडलिक सरोदे | नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर | राहाता पो. ठाणे |
| 13 | पोनि/ बालाजी मदनराव वैद्य | एच.टी.यू., अहिल्यानगर | तोफखाना पो. ठाणे |
| 14 | पोनि/ हनुमान लहानू गायकवाड | नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर | कर्जत पो. ठाणे |
| 15 | सपोनि/ युवराज अर्जुनराव आठरे | आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर | लोणी पो. ठाणे |
| 16 | सपोनि/ माणिक भाऊसाहेब चौधरी | एम.आय.डी.सी. पो. ठाणे | आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर |
| 17 | सपोनि/ जगदीश दिपाजीराव मुलगीर | भिंगार कॅम्प पो. ठाणे | आर्थिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर |
| 18 | मसपोनि/ तेजश्री विठ्ठल थोरात | कोतवाली पो. ठाणे | भिंगार कॅम्प पो. ठाणे |
| 19 | सपोनि/ हेमंत शिवाजी थोरात | घारगाव पो. ठाणे | एम.आय.डी.सी. पो. ठाणे |

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com