Top News

Parner News | महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : राणी लंके

 Parner News | महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : राणी लंके 

Parner News | महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : राणी लंके





कान्हूरपठार व परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असून महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी आपण विधानसभेत आवाज उठवून शास्वत पाणी योजना माग लावण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांनी दिली.


लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीसाठी राणी लंके या कान्हूरपठारमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले.



यावेळी बोलताना लंके म्हणाल्या, सन २०१९ मध्ये खा. नीलेश लंके यांना मतदारांनी मोठया मताधिक्क्याने विधानसभेत पाठविल्यानंतर त्यांनी त्या पदाला न्याय दिला. मतदारसंघात हजारो कोटी रूपयांची कामे माग लावली. कोणत्याही लोकप्रतिनिधीने मतदार संघात साडेचार वर्षांच्या कालखंडात इतक्या मोठया प्रमाणात विकास कामे माग लावलेली नाहीत. 


प्रत्येक गावाला विकास कामे देण्याचा प्रयत्न केला गेला. विकास कामे देताना कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता कामे मंजुर करण्यात आली. असे असतानाही विरोधक विकास कामांबाबत चर्चा करतात ती हस्यास्पद आहे.



 राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनीच लोकसभा निवडणूकी दरम्यान खा. लंके यांनी मतदारसंघासाठी किती निधी खेचून आणला याबाबत सांगितलेले असताना विकास कामांबाबत स्वतः कडे सांगण्यासारखे काही नसताना नागरीकांची दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत असल्याचे लंके यांनी सांगितले.



यावेळी चंद्रभान ठुबे, किरण ठुबे, बाबासाहेब घुमटकर, प्रसाद नवले, धनंजय ठुबे, शिवाजी व्यवहारे, सरपंच संध्या ठुबे, मा. सरपंच गोकुळ काकडे, मा. उपसरपंच सागर व्यवहारे, विशाल लोंढे, वैभव साळवे, बापू चत्तर, श्रेयश घोडके, तुषार सोनावळे, सुरज नवले, गणेश तांबे, ज्ञानेश्वर गायखे, श्रीकांत ठुबे, राणी घुमटकर, गीतांजली ठुबे, सुशिला ठुबे, देवराम टेकाडे, आनंदीबाई टेकाडे, अनिता घोडके, लता ठुबे,राजाराम ठुबे, भोमा ठुबे, गणेश गायखे आदी उपस्थित होते.



लंके यांचे आगमन झाल्यानंतर त्यांची मुख्य बाजारपेठेतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. महिलांकडून त्यांचे औक्षण करण्यात येत होते. महिला तसेच कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून ही प्रचाराची सभा नाही तर विजयाची सभा असल्याचा अभास होत असल्याचे लंके यांनी सांगितले.


कोणत्या चेंडूवर चौकार, षटकार मारायचा हे मला चांगले जमते


मला सभेमध्ये बोलता येईल का याबाबत काहींचे गैरसमज होते. मात्र वेळप्रसंगी काय बोलायचे, कोणत्या चेंडूवर चौकार, षटकार मारायचा हे मला चांगले जमते असे सांगत लंके यांनी आपण सभा गाजविण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले.


विविध पश्नांवर विधिमंडळात आपण आक्रमक भुमिका मांडू : राणी लंके 

Parner News | महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : राणी लंके



सन २०१२ मध्ये पंचायत समितीचे उपसभापतीपद, सन २०१७ मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्यपद तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद आपण भुषविलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाच्या अनुभवामुळे मला जनतेचे प्रश्न ज्ञात आहेत. याच अनुभवाच्या शिदोरीवर पारनेर-नगर मतदारसंघाच्या विविध पश्नांवर विधिमंडळात आपण आक्रमक भुमिका मांडून खा. नीलेश लंके यांच्याप्रमाणेच विकासाची अविरत सुरू ठेवणार आहोत.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم