Top News

नगरमधील कंत्राटदाराची तब्बल ३ कोटी ५० लाखांची फसवणूक

 शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून ज्यादा परताव्याच्या आमिषाने नगरमधील कंत्राटदाराची तब्बल ३ कोटी ५० लाखांची फसवणूक

नगरमधील कंत्राटदाराची तब्बल ३ कोटी ५० लाखांची फसवणूक





नगर : दर्शक ।

 शेअर बाजारामध्ये मोठी गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगरमधील एका कंत्राटदाराची तब्बल ३ कोटी ५० लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात श्रीरामपूर येथील संशयित आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




याबाबत प्रणव प्रवीण कटारिया (वय २९, रा. शिवनेरी मार्ग, स्टेशन रोड) यांनी १० एप्रिल रोजी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे व्यवसायाने कंत्राटदार आहेत. त्यांची आरोपी ओंकार संतोष हासे (रा. श्रीरामपूर) याच्याशी ओळख झाली होती. ओंकार याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत




आरोपीने फिर्यादीला गुंतवणुकीवर चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून कटारिया यांनी वेळोवेळी ३ कोटी ५० लाख १३ हजार रुपये एवढी रक्कम आरोपीच्या खात्यावर जमा केली. मात्र, दीर्घ काळ उलटूनही आरोपीने ना परतावा दिला, ना मुद्दल रक्कम परत केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कटारिया यांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. 



अर्जाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर १० एप्रिल रोजी याप्रकरणी आरोपी ओंकार हासे याच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ४०६ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तातडीने भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे हे करत आहेत.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم