गॅसचा तुटवडा नाही तर काळाबाजार कसा होत आहे ? डॉ परवेज अशरफी
नगर - जगात इराण विरुद्ध अमेरिका इस्राईल युद्ध चालू असल्याने इराणने स्ट्रेट हार्मोज बंद केल्यामुळे पूर्ण जगात तेलाच्या वाहतुकीवर प्रतिबंध लागले आहे. नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आपल्याकडे मुबलक साठा आल्याचं दावा केला आहे. परंतु सामान्य जनतेला जिल्हा अधिकारीवर पूर्ण विश्वास नसल्याने सामान्य जनता अस्वस्थ झाली आहे. कारण देशाचे प्रधान मंत्री यांनी दावा केला की आपल्या देशाला तेलाची कोणतीही कमी होणार नाही.व दोनच दिवसांनी संसदेच्या भाषणात घोषणा केली की कोरोना सारखी परिस्थिती येण्याची शक्यता आहे सामान्य जनतेने तयारी करावी.
त्यामुळे सामान्य जनता यांना जिल्हा अधिकारी यांनी केलेल्या वक्तव्यावर विश्वास होणे अशक्य झाले आहे. सामान्य जनता त्यांना लागणारे घरगुती सिलेंडराची सोय स्वतः करत आहे.
सर्व गॅस सिलिंडरचा एजन्सीत सिलिंडर साठी रांगा लागल्या आहेत. तसेच नोंदणी म्हणजेच बुकिंग केल्यास २ दिवसात सिलेंडर घरी पोहोच होत होता परंतु आता नोंदणी केल्यास दहा ते बारा दिवसाचा कालावधी लागेल सांगण्यात येत आहे. आणि २५ दिवस उलटूनही सिलिंडर पोहोच होत नाही कारण विचारल्यास अजून १०-१५ दिवस लागतील असे उत्तर देण्यात येतात.
या उलट काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती तीनपट रकमेत सिलेंडर विकत आहे आणि मजबूर झालेली सामान्य जनता नाविलाज तीनपट रक्कम देऊन संसार चालवण्यासाठी विकत घेत आहे.
आता प्रश्न असा आहे की एकीकडे जिल्हाधिकारी मुबलक साठा असल्याचा दावा करत आहे आणि दुसरीकडे सामान्य जनतेच्या गॅस साठी रंगाच्या रांगा लागल्या आहे. तिसरीकडे तीनपटीने काळाबाजार होत आहे. काळाबाजार होत असताना जिल्हाधिकारी साहेब कुठे आहेत? या काळाबाजार करणाऱ्या लोकांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केले आहे.
निवेदनात पुढे असे नमूद आहे की या सर्वांपासून सामान्य जनतेला दिलासा तेव्हाच मिळेल जेव्हा सर्व सुरळीत होईल. त्यासाठी जिल्हा अधिकारी यांना काळाबाजार रोखणे खूप गरजेचे आहे. काळाबाजार करण्यासाठी शासन प्रशासनातील कर्मचारी अधिकारी सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा आरोपही करण्यात आले आहे.
सखोल चौकशी करून आणि काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींवर आणि त्यांना मदत करणाऱ्या शासन प्रशासनमधील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी एम आय एम तर्फे करण्यात आली आहे.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com