Top News

Education Video | राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत अर्चना बोरुडे प्रथम

 Education Video | राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत अर्चना बोरुडे प्रथम

Education Video | राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत अर्चना बोरुडे प्रथम


         

नगर : दर्शक ।  राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ चा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जलशुद्धीकरण ( विळदा ) येथील शिक्षिका अर्चना बोरुडे  यांनी तालुकास्तरावरील दोन स्पर्धेत प्रथम व गणित गटात तृतीय  क्रमांक तालुका मिळवून तालुक्यातून अव्वल स्थान मिळवले आहे .


        या स्पर्धेत गट १- इ  १ ते  २ री, गट २- इ . ३ ते ५ वी , गट -३ -इ . ६ ते ८ वी , गट ४ -९ ते १० वी ,गट ५ - इ . ११ ते १२ वी, गट ६ - अध्यापक विद्यालय अशा एकूण सहा गटात विषय निहाय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. 


      अर्चना बोरुडे यांनी विविध गटात व्हिडिओ. अपलोड करून स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यापैकी इ . ६ ते ८ इंग्रजी - प्रथम, इ . ९ ते १० इंग्रजी - प्रथम, इ . इ . ३ ते ५ गणित - तृतीय क्रमांक मिळवला आहे.


 तालुकास्तरावर दोन  व्हिडिओला प्रथम क्रमांक व एका व्हिडिओला तृतीय क्रमांक प्राप्त झाले असून   एकूण सात हजार पाचशे रुपये रोख बक्षिसाच्या त्या मानकरी ठरल्या.

       महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजीत शैक्षणिक व्हीडिओ निर्मिती स्पर्धेत अर्चना बोरुडे यांना प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देताना गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, विस्तार अधिकारी संजय बोबडे  यांच्या हस्ते देण्यात आले.


      अर्चना बोरुडे यांना तंत्रज्ञानात पूर्वीपासूनच आवड असल्याने त्यांनी अनेक. शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करून ते  स्वतःच्या  यूट्यूब चैनल वर अपलोड केलेले आहेत. त्यांच्या या व्हिडिओचा वापर त्यांच्या शाळेतील विद्याथ्यांसोबत संपूर्ण देशातील विद्यार्थी सुद्धा लाभ घेतात . 


शिक्षण क्षेत्रात तसेच तंत्रज्ञानात नवनवीन प्रयोग करणे हे त्यांचे आवडीचे कार्य असल्यामुळे या  स्पर्धेतील यशाने त्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. त्यांनी या यशाचे श्रेय त्यांचे विद्यार्थी, जे नेहमी त्यांना व्हिडिओ तयार करण्यास प्रवृत्त करतात यांना दिले आहे .

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم