Top News

Rotary Club | विद्यार्थ्यांनो, यशावर थांबू नका, पुढे चालत राहा - आयुक्त यशवंत डांगे

 प्रगत  विद्यालय व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगत स्कॉलरशिप 2025 चा निकाल घोषित ; इ.10 वी.चा धीरज भांड व सुमेध मुजूमदार, इ.7 वी.चा अवधूत शिंदे प्रथम


Rotary Club | विद्यार्थ्यांनो, यशावर थांबू नका, पुढे चालत राहा - आयुक्त यशवंत डांगे



     Social Work | नगर : दर्शक । ही परीक्षा म्हणजे केवळ शालेय अभ्यासक्रमाचे परीक्षण नाही, तर विद्यार्थ्यांच्या कष्ट, चिकाटी, अभ्यासपद्धती आणि आत्मविश्‍वासाचे मूल्यांकन आहे. आज ज्या विद्यार्थ्यांनी हा मानाचा टप्पा गाठला आहे, त्यांनी आपल्या मेहनतीने हे सिद्ध केले आहे की, सातत्याने आणि नियोजनबद्ध अभ्यास केल्यास कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. 



विद्यार्थ्यांनो, हे यश हे एक पाऊल आहे - शेवट नव्हे. आयुष्यात असे अनेक टप्पे येतील. प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील, चुका करायला मिळतील, आणि त्या चुकांतूनच पुढे वाट सापडेल. त्यामुळे हे यश मनात साठवा, पण त्यावर थांबू नका.  तुमचे ध्येय मोठे ठेवा, पण त्यासाठी दररोज एक पाऊल पुढे टाका. तुमचा अभ्यास, जिज्ञासा आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नक्कीच यशाच्या शिखरावर घेऊन जाईल, असे प्रतिपादन मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.





     दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगत स्कॉलरशिप 2025 चा निकाल घोषित करण्यात आला. इयत्ता दहावीचा भांड धीरज व सुमेध मुजूमदार यांनी 200 पैकी 166 गुण मिळवून ते अहिल्यानगर व तालुकास्तरीय प्रगत स्कॉलरशिप परीक्षेत प्रथम आले. तर इयत्ता 7 वी मध्ये शिंदे अवधूत संतोष 200 पैकी 178 गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.



      सदरचा बक्षीस वितरण समारंभ अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल यांचे अध्यक्ष डॉ. कुणाल कोल्हे, डॉ. श्रेया खाजगीवाले, सचिव सुनील कटारिया, प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन उमेश रेखे, सेक्रेटरी किरण वैकर, नगरसेवक सोनाली चितळे, शिवसेना नेते संतोष गेनप्पा, प्राचार्य सुनील पंडित आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.



      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन उमेश रेखे तर पाहुण्यांचा परिचय प्राचार्य सुनील पंडित यांनी करून दिला.     यावेळी रोटरीचे अध्यक्ष डॉ कुणाल कोल्हे व सेक्रेटरी किरण वैकर, प्राध्यापक रोहित सुंबरे व विकास जाधव आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ हर्षाली देशमुख व रोकडे दिलीप यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय गरड यांनी केले. 



       यावेळी गुणवत्ता यादीतील व परीक्षेतील प्राविण्य झालेले विद्यार्थी, पालक,  संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



     निकाल पुढीलप्रमाणे -( गट - 10 वी) - धीरज भांड 166 गुण मिळवून प्रथम, सुमेध ऋषिकेश मुजुमदार 166 गुण मिळवून प्रथम, अनिशा कोथवाले  162 द्वितीय, चैतन्य ठाणगे 158 गुण मिळवून तृतीय, उत्तेजनार्थ -वेदांत गव्हांदे, ध्रुव दरंदले, वरद दाणे, शंकर पवार, प्रणाली शिंदे, विवेक नेमाने, श्रद्धा दिकोंडा.



(गट- 7 वी ) - अवधूत शिंदे 178 गुण मिळवून प्रथम, प्रथमेश जाधव व आर्या मोरे 172 गुण मिळवून द्वितीय,  मृणाल तमनर व समर्थ बोरुडे 170 गुण मिळवून तृतीय, उत्तेजनार्थ -सत्यजित नबागे, कौस्तुभ तोरकड, आर्यन कुलट, आयुष कदम, श्रावणी काकडे, आयुष भोंडवे, शौर्य आठरे, अनन्या मिसळ




Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم