Parner | जय मल्हार विद्यालयाची १००% निकालाची ५ वर्षाची परंपरा कायम
नगर-जय मल्हार विद्यालय पिंपळगावरोठा,ता.पारनेर हे सेमी इंग्रजी विद्यालय असून या विद्यालयाने सलग ५ वर्षे १००% निकालाची उत्कृष्ट परंपरा कायम राखली आहे.एसएससी मार्च २०२५ बोर्ड परीक्षा विद्यालयाचा निकाल १००% टक्के लागला आहे.या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव ॲड.पांडुरंग गायकवाड,जनार्दन महाराज मुंडे,प्रभारी मुख्याध्यापक बी.आर उंडे,नानाभाऊ भांबरे,राजाराम शिंदे ,राजाराम पुंडे,संदीप घुले,भास्कर पुंडे,रघुनाथ पुंडे,बाळू घुले,अशोक उमाप,बाळू खोसे,शंकर गायकवाड,संदीप जगताप,बन्सी ढोमे,विठ्ठल उमाप,शिवाजी उमाप,सौ सविता राजदेव,इकबाल मुजावर,पांडुरंग जगताप,भास्कर मुळे,राजाराम पुंडे,मा.सरपंच बबन चिमाजी पुंडे,गोपीनाथ घुले(अध्यक्ष तंटामुक्ती),साहेबराव पंडित,शालेय कर्मचारी,माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक, ग्रामस्थ,हितचिंतक,माजी विद्यार्थी मोठ्या संख्नेने उपस्थीत होते.
या प्रसंगी मनोगता मधून ॲड.गायकवाड साहेब यांनी सांगितले की, ही विद्यालयाची ही २५ बॅच होती आणि या बॅचने १००% निकाल अपेक्षित होता आणि तो या बॅचने दिला म्हणून या बॅचचे विशेष कौतुक करतो.ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून चांगल्या पदावर विराजमान व्हावे.
शाळेचे नवीन इमारत बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. तळमजला बांधकाम पूर्ण झालेले आहे. दुसरा मजला व तिसऱ्या मजल्याचे बांधकाम बाकी आहे. त्यासाठी नविन देणगीदारांना देणगी देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून शंभर टक्के निकाल लावला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानून त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गरकळ सरयांनी केले प्रास्ताविक विद्यालयाचे शिक्षक जरांगे सर यांनी केले व आभार केदारी सर यांनी मानले.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com