Health Camp Savedi | विनय वाखुरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
Health Camp Savedi | नगर : दर्शक । - विनायक राज प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विनय वाखुरे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिराती, फ्लेक्स, केक कापणे व इतर खर्च टाळून सामाजिक उपक्रम म्हणून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
सध्या वाढणारे आजारांचे प्रमाण ,आरोग्य तपासणी करता नागरिकांना जास्त पैसे देणे अशक्य असते त्यामुळे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते यामधून दिलासा देण्यासाठी सावेडीत गुलमोहररोड वरील कमलाबाई नवले स्मारक येथे विनायकराज प्रतिष्ठान तर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाच्या प्रारंभी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत पावलेल्या ना श्रद्धांजली वाहण्यात आली ,या मोफत आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार औषधे वाटप करण्यातआले यामध्ये मोफत नेत्र तपासणी मध्ये मोतीबिंदू असणाऱ्यांना शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. तसेच रक्त तपासणी मध्ये थायरॉईड, किडनी, लिव्हर, कॅन्सरमार्कर,रक्तातील चरबी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या
तसेच तपोवन रोडच्या बालघर प्रकल्पातील मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना खाऊ व वह्या भेट देण्यात आल्या तसेच अनेकांनी यावेळी नेत्रदान, अवयव दान चे ऑनलाईन संमती पत्र भरून दिले यावेळी अनेकांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून विनय वाखुरे यांना भावी वाटचालीसाठी शुभेछया दिल्या

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com